एस.टी.महामंडळ श्रीवर्धन डेपोच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवासी वर्गाला नाहक त्रास

रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन एस .टी डेपो कडून सातारा , श्रीवर्धन एस .टी डेपो कडून सातारा, मुंबई, नाशिक, ठाणे, बोरिवली, पुणे, नलासोपारा.तसेच लोकल सेवा फेऱ्या नेहमी चालू असतात परंतु वाहतुकीचे नियोजन तसेच मेंटेनन्स व्यवस्थित होत नसल्याने प्रवासी वर्गाला नाहक त्रास सोसावा लागत आहे. डेपो मॅनेजर तेजस गायकवाड यांची रोहा येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अजून पर्यंत कोणीही हजर झाले नसल्याने .याची झळ श्रीवर्धन डेपोला बसत आहे. श्रीवर्धन मेघरे अशी लोकल सेवा देणारी बस यामध्ये कंडक्टर कडून नागरिकांना मागे
असणाऱ्या सीटवर बसण्यास मज्जाव करण्यात येत होता.असे प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कळले आहे. याचे कारण काय ? दररोज सुटणाऱ्या गाड्यांपैकी आज दिनांक २२/१२/२०२२ रोजी ८.३० वाजता सुटणारी श्रीवर्धन.बोरीवली. १० वाजता सुटणारी श्रीवर्धन. बोरीवली ११ वाजता सुटणारी बोर्लि मार्गे. बोरवली ११.१५ वाजता सुटणारी बागमंडला. मुंबई. या गाड्या वेळेत न सुटल्याने या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. याबाबत वाहतूक निरीक्षक शरवरी लांजेकर यांच्याशी संपर्क केला असता येणाऱ्या गाड्या उशिरा आल्याने अडचण निर्माण झाले असल्याचे तसेच मेंटेनेस साठी वेळ गेल्याने १२ वाजता गाड्या सुटल्याचे सांगितले. खरंच गाड्या उशिरा आल्या का ? याची शहानिशा करण्यासाठी वाहतूक नियंत्रक यांच्याशी संपर्क केला असता पुणे येथून येणारी गाडी सोडल्यास कोणतीही गाडी उशिरा न आल्याचे तसेच पहाटेच्या सर्व गाड्या वेळेत आल्याचे समजले. या दोघां कडून मिळालेल्या वेगवेगळे उत्तराची वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार का ? की वरिष्ठ अधिकारी यांनाही वेळेत न सुटणाऱ्या गाड्यांची सर्व कल्पना आहे ? यात मात्र कामानिमित्त निघालेल्या प्रवासी वर्गाला नाहक त्रास सोसावा लागला आहे. मग त्यांनी अवैध प्रवासी
वाहतुकीचा सहारा घेतल्यास वावग ते काय.अवैध्य वाहतुकीला प्रोत्साहन देऊन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा नवा फंडा तर महामंडळाने काढला नाही ना ? म्हणे अवैध वाहतूक कारवाई साठी एक गाडी तसेच काही अधिकाऱ्यांची निवड ही करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कारवाही करण्यात येत असते. यावर खर्च करण्यापेक्षा एस. टी महामंडळ श्रीवर्धन डेपोची सेवा सुधारण्यावर लक्ष दिल्यास त्याचा फायदा एसटी महामंडळाला नक्कीच होईल हे अवैद्य प्रवासी वाहतूक करताना कारवाईचा अनुभव आलेल्या नागरिकां कडून बोलले जात आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













