नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री समर्थ कृपा विद्यालय वेरळ येथे वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न – आजचा महाराष्ट्र

श्री समर्थ कृपा विद्यालय वेरळ येथे वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचालित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वेरळ येथे १३ व १४ डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा

महोत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री संतोष शिर्के शारीरिक शिक्षण संघटना अध्यक्ष, श्री अमोल दळवी खेड जेसीआय अध्यक्ष, श्री प्रथमेश खामकर जे.सी.आय अध्यक्ष, श्री हर्षल शिरोडकर, श्री विलास बेंद्रे राष्ट्रीय प्रो कबड्डी पंच, श्री ना. बा. शेलार, श्री गणेश जाधव, श्री संदेश पाष्टे व अमृता गांधी शिक्षक पालक संघटना सदस्य उपस्थित होते. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नर्सरी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये कबड्डी, लंगडी, खो खो, हॉलीबॉल इत्यादी सांघिक खेळ तसेच उंचउडी, लांब उडी, धावणे, बटाटा शर्यत, सॅकरेस, गोळा फेक, थाळीफेक इत्यादी वैयक्तिक खेळ घेण्यात आले.

विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष श्री सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन श्री उदय शेटवे, खजिनदार श्री दिग्विजय इंदुलकर, शाळेचे प्राचार्य डॉक्टर एस. एस. अली, शैक्षणिक समन्वयक डॉक्टर अजित भोसले, पर्यवेक्षक श्री ए. एच. घोसाळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]