पुई ग्रामविकास आघाडीला मतदाराचा वाढता पाठिबा विशेष

रायगड (रोहा) – रोहा तालुक्यातील पुई ग्रामपंचाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून ग्रामविकास आघाडीच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली असुन पुई ग्रामविकास आघाडीला मतदारांची गावातून, पाटबंधारे कॉलनी तसेच आदिवासीवाडी मधूनभरभरून साथ मिळत असल्याचे दिसून येत आहे,ग्रामविकास आघाडीचे सर्व उमेदवार मतदारांच्या
घरोघरी जावून गावातील अबालवृध्दांच्या, महिलांच्या सरपंच पदाचे उमेदवार सौ,अस्मिता अनंत सानप प्रत्यक्ष भेट घेत आहेत. यांना जनमानसातून मोठा पाठिबा मिळत असल्याचे चित्र आज दिसून आले,पुई ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ वाढवुन करण्यात आला.यावेळी पुई गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व मान्यवर हजर होते. प्रत्यक्षात मैदान मारून विजयाची सलामी देणारे उमेदवार
सौ,सारिका खामकर,अबिद,सय्यद,शकुंतला वाघमारे,दिव्या चितळकर ,नामदेव आबेकर,प्रतिक्षा कदम,अजित लहाने हे सर्व उमेदवार ग्रामविकास आघाडी कडून रिंगणात उतारले असुन या पुई ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदाच्या उमेदवारामध्ये दुरंगी लढत होणार असुन तसेच सध्याचे चित्र अस्मिता अंनत सानप याचे पारडे जड असल्याचे पुई व कोलाड परिसरातुन बोलले जात आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













