AOPLऑरगॅनिकचे शानदार लॉन्चिंग सेंद्रिय अन्न ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध

रत्नागिरी (खेड) – अभिकृष्णा ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पहिलेच सेंद्रिय अन्न (विषमुक्त अन्न) उपलब्ध करून देणाऱ्या AOPL ऑरगॅनिक स्टोअर्सचे उद्घाटन मा. आमदार शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते आणि इतर प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत चिपळूण येथे मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले. या कंपनीने AOPL आॕरगॕनिक (विषमुक्त अन्न) हा ब्रँड मार्केटमध्ये आणला आहे.

हे ऑरगॅनिक स्टोअर्स शेतकऱ्यांच्या शेतातील सेंद्रिय धान्य खरेदी करून तो माल रिपॅकिंग करून लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. शेतकऱ्यांचा सेंद्रिय माल ही कंपनी खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांनाही बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. तसेच या माध्यमातून अनेक गरजूंना रोजगारही उपलब्ध होणार आहे. सेंद्रिय मालाची जनजागृती तसेच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चिपळूण
मधीलकाही तरुण-तरुणीही पुढे आल्या आहेत. या कार्यक्रमाला मा. डॉ. प्रशांतजी बोडके (सहयोगी अधिष्ठाता विभाग प्रमुख कृषी विद्या तथा प्रमुख सेंद्रिय शेती संशोधन केंद्र डाॕ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली), मा. प्रसादजी शिंगटे (मुख्याधिकारी नगरपरिषद चिपळूण) मा. आशिष खातू, मा. लियाकत शहा, मा. सतीश आप्पा खेडेकर, मा. होमकळस्कर मॅडम, मा. बापूजी काणे, मा. कृष्णाजी गावकर तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असणारे सेंद्रिय अन्न तसेच सेंद्रिय मालाची वाढती मागणी पाहता AOPL आॕरगॕनिक स्टोअर्स चिपळूणच्या धर्तीवर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतर भागातही AOPL ऑरगॅनिकचे स्टोअर्स चालू करून नागरिकांना सेंद्रिय (विषमुक्त) अन्न उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस हे असे संचालिका सुनिता गावकर शेवटी म्हणाला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश आंबेरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार तिलेश जाधव यांनी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













