मायबाप रसिक प्रेक्षकांच्या उपस्थित “दिवा नगरीत कोकण कलेचा “शक्तितुरा” कार्यक्रम संपन्न

ठाणे(सुदर्शन जाधव)-
शब्दाला हाकेची जोड…..
कलेला आपुलकीची ओढ…

रत्नागिरी :- शनिवार दिनांक ३० जुलै २०२२ रोजी नियोजित कार्यक्रम ठाणे जिल्ह्यातील दिवा नगरीत “शक्ति तुरा” कोकणी कलेचा पार पडला. मायबाप रसिक प्रेक्षकांच्या अनमोल प्रतिसादाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. अक्षय कदम,उमाजी शिंदे,प्रवीण टोळे,सुदर्शन जाधव,दिंगबर शितप,अमित भुवड,लक्ष्मण जाधव आणि इतर सहकारी यांच्या नियोजनामधून शक्ती तुरा जंगी सामना शक्तीवाले शाहिर प्रकाश चव्हाण विरुद्ध तुरेवाले शाहिर राजू धावडे दोघांमधे सामना आयोजित करण्यात आला होता.रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील रोहिणी गावातील “दिवाडकर महिला नृत्य कलापथक” आणि “ओम साई नाच मंडळ अंबरनाथ बारकू पाडा” 
यांनी खूप सुंदर कलाविष्कार सादर केला आणि मायबाप रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.अक्षय कदम,सुदर्शदन जाधव,प्रविण टोळे शिध्देश दादा पाटील आणि इतर सहकारी मंडळीने खूप मेहनत घेऊन कार्यक्रम हाऊसफुल केला.प्रती कोकण दिवा नगरी मधील रसिक प्रेक्षकांनी सुंदर प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.जाखडी कलेमधून नवनवीन नृत्यप्रकार रसिक प्रेक्षकांना पाहण्यासाठी मिळत आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













