नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पोटच्या मुलीचा आईकडून अमानुष छळ – आजचा महाराष्ट्र

पोटच्या मुलीचा आईकडून अमानुष छळ

पत्रकार जितीन शेट्टी

रायगड/ पनवेल :- स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अशी म्हण आहे पण आजच्या काळात एक विचित्र उदाहरण पाहायला मिळाले की स्वतःच्या पाच वर्षांच्या मुलीवर सख्खी आई अत्याचार करत होती. शारीरिक आणि मानसिक छळ करीत होती . या चिमुरडीला उपाशी ठेवणे,बांधून ठेवणे, कोंडून ठेवणे, केस पकडून उचलून फेकणे ,सतत मारहाण करणे अशा प्रकारे अमानुष पद्धतीने आई त्रास देत होती. चैतन्य सोसायटी मध्ये हा प्रकार घडला असून सोसायटीच्या सौ रंजना सुतार मॅडम आणि सर्व महिला यांनी एक व्हिडिओ बनवुन सामाजिक कार्यकर्त्या

सामाजिक कार्यकर्त्या चित्रा देशमुख

चित्रा देशमुख यांना पाठविला ज्यामधे आई त्या चिमुरडीला मारत आहे. अशी तक्रार आल्यावर चित्रा देशमुख यांनी लगेच खांदेश्वर पोलिस स्टेशनच्या क्राईम पी आय वैशाली गलांडे मॅडम यांना कळविले त्यांनी त्यांची टीम तात्काळ पाठवून मुलीची या अमानुष छळ करणार्‍या आईच्या जाचातून सुटका केली. क्राईम पी आय वैशाली गलांडे मॅडम, पोलिस अधिकारी श्री परशुराम केंगार, श्री विठ्ठल पारधी, श्री अमोल खाडे यांचे खूप आभार

क्राईम पी आय वैशाली गलांडे

चैतन्य सोसायटी च्या सर्व धाडसी महिला आणि सर्व लहान मुले यांचे खूप अभिनंदन .या सर्व सदस्यांनी हा सर्व प्रकार धाडसीपणे समोर आणला ज्यामुळे त्या लहान मुलीचा जीव वाचला. सामाजिक जाणीव ठेऊन काम केल्याबद्दल या सोसायटीला शौर्य पदक मिळाले पाहिजे आणि क्राईम पी आय आणि सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सुध्दा शौर्य पदक मिळावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]