नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भिवंडीत बंद घर फोडून ७३ हजारांचा ऐवज लंपास; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी पळविला! – आजचा महाराष्ट्र

भिवंडीत बंद घर फोडून ७३ हजारांचा ऐवज लंपास; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी पळविला!

दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांच्या घरी चोरी; परदेश दौऱ्यावर असताना चोरट्यांनी साधली संधी

ठाणे / भिवंडी :-  दि. १४ ऑक्टोबर : नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैलासनगर, वळपाडा येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची

घटना उघडकीस आली आहे. दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांच्या घरी ही चोरी झाली. पाटील कुटुंबीय परदेश दौऱ्यावर गेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

परदेश दौऱ्याची संधी साधून घरात चोरी

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, श्री समर्थ कृपा सदन, घर क्रमांक १३४६, कैलासनगर, वळपाडा येथे राहणारे डॉ. किशोर बळीराम पाटील (वय ५६) हे आपल्या कुटुंबासह ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे दोन वाजता मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर गेले होते. घरातून बाहेर पडताना त्यांनी घराला तसेच कंपाऊंड गेटला कुलूप लावले होते. घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले होते. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर होते.

सीसीटीव्हीचे लॉगिन बंद झाल्यानंतर चोरी उघड

१२ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजेपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याचे दिसत होते. मात्र, त्यानंतर कॅमेऱ्यांचे लॉगिन बंद झाले. १४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे एक वाजता पाटील कुटुंबीय घरी परतले असता, घरातील बेडरूममधील कपाटे उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटांच्या ड्रॉवरची कुलपे तोडण्यात

आली होती. वरच्या मजल्यावरील दोन्ही बेडरूममधील कपाटांचे ड्रॉवरही फोडण्यात आले होते.घराची पाहणी केली असता, मागील बाजूच्या स्टोअर रूमच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडलेली आढळली. तसेच हॉलमध्ये ठेवलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही गायब होता. सीसीटीव्हीतील दृश्ये मिळू नयेत किंवा पुरावे नष्ट व्हावेत, या उद्देशाने चोरट्यांनी डीव्हीआर पळविला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि डीव्हीआर चोरीला

चोरट्यांनी घरातून ६० हजार रुपये रोख, सुमारे १० हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंग आणि तीन हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, या घटनेत प्रत्यक्षात अंदाजे एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे डॉ. किशोर बळीराम पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. चोरट्यांनी घरातील लाकडी फर्निचरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, त्यामुळे अतिरिक्त आर्थिक फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले.

नारपोली पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील आणि सहकारी पोलीस हवालदार करीत आहेत.कैलासनगरच्या पोलीस पाटील डॉ. सुनंदा अशोक पाटील यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. बंद घराला लक्ष्य करून सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा छडा लावण्याचे आव्हान आता नारपोली पोलिसांसमोर आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]