मुंबई विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी मनिलाल शिंपी
बी.के.बिर्ला महाविद्यालयाचा शिरपेचात दुहेरी मुकुट पुरुष व महिला दोन्ही कबड्डी संघ प्रथम क्रमांकाचे मानकरी
ठाणे / कल्याण :- मुंबई विद्यापीठ क्रीडा समिती, ठाणे विभाग आणि प्रगती महाविद्यालय, डोंबिवली (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमदार रविंद्र चव्हाण आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ, डोंबिवली (पूर्व) यांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कबड्डी ठाणे विभाग स्पर्धा २०२६-२७ उत्साहात पार पडली. कबड्डी तपस्वी रमेश देवाडीकर कबड्डी प्रशिक्षण केंद्र, नेहरू मैदान, डोंबिवली येथे दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून पुरुष व महिला गटातील सुमारे ६० ते ६५ संघ आणि ७५० ते ८०० खेळाडूंनी सहभाग घेतला.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष 
मा. जगन्नाथ पाटील, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या श्रीमती सिमरत सतीश गायकवाड, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री. जितेश जोशी, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मा. नगरसेवक जितेंद्र भोईर, गणेश मंदिर संस्थांचे श्री. निलेश सावंत, संस्थेचे विश्वस्त, विविध मान्यवर तसेच प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे उपस्थित होते.पुरुष गटामधे बिर्ला महाविद्यालय, कल्याण संघ विजयी ठरला. एस.एस.टी. महाविद्यालय उल्हासनगर द्वितीय क्रमांक तर डोंबिवलीचा वंदे मातरम् महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला असून चतुर्थ क्रमांकाचा मांजरी भिवंडी येथील बी.एन.एन. महाविद्यालयांने मिळवला.महिला गटात विजेता देखील बिर्ला महाविद्यालय कल्याण संघाने बाजी मारली.द्वितीय क्रमांक ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे तर तृतीय क्रमांकावर सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय शहापूर यांनी मिळवला ठाणे येथील एन.के.टी. महाविद्यालयाने चतुर्थ श्रेणीत समाधान व्यक्त केले.ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते जितेश जोशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी समाजसेवक सुजित नलावडे, शैलेंद्र भोईर, प्रशांत जाधव, माजी कबड्डीपटू रितेश साटम (मुंबई पोलीस), आशिष पाटील, ठाणे पोलीस भूषण देवाडीगा,निलेश सावंत, गौरव माहीमकर, निलेश घाडीगावकर, सतीश मेढेकर,मनोज शिंदे आदी मान्यवर व कबड्डी क्षेत्रातील खेळाडू उपस्थित होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण व शहरी भागातील अधिकाधिक होतकरू खेळाडूंना संधी मिळावी आणि त्यांनी ठाणे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे यांनी आपल्या मनोगतात कबड्डी तसेच अन्य क्रीडा प्रकारांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व रोजगाराच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या क्रीडा आरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. क्रीडेमुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्याबरोबरच सामाजिक जीवनातही आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व विकास होतो, असे त्यांनी सांगितले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई विद्यापीठ क्रीडा समिती ठाणे विभागाचे सेक्रेटरी प्रा.गणेश मोरे, प्रगती महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.लक्ष्मण इंगळे, जिमखाना प्रमुख डॉ. मुकेश पाटील, राजन आभाळे, गणेश मंदिर संस्थांचे निलेश सावंत, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी सतीश मेढेकर, अश्वमेध क्रीडा मंडळाचे मनोज शिंदे तसेच प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.या स्पर्धेसाठी मा. आमदार श्री. रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.राष्ट्रीय गीताने स्पर्धेचा समारोप करण्यात आला.या दोन दिवसीय स्पर्धेला डोंबिवलीतील कबड्डीप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्पर्धेचा आनंद घेतला. विशेष म्हणजे पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत बिर्ला महाविद्यालय, कल्याणने विजेतेपद पटकावत दुहेरी यश संपादन केले.संपूर्ण स्पर्धेचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरुंधती आतकर यांनी केले, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे क्रीडा संचालक लक्ष्मण इंगळे यांनी आभार व्यक्त केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













