नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेला तृप्ती देसाई यांचे प्रत्युत्तर…. “सुनेत्रा पवार गुंगी गुडिया असत्या तर त्या उपमुख्यमंत्री झाल्याच नसत्या”… – आजचा महाराष्ट्र

सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेला तृप्ती देसाई यांचे प्रत्युत्तर…. “सुनेत्रा पवार गुंगी गुडिया असत्या तर त्या उपमुख्यमंत्री झाल्याच नसत्या”…

प्रतिनिधी

पुणे :- दि.४(आ.मा.टॉ.टे.न्यू )सुनेत्रा पवार यांच्यावर “गुंगी गुडिया” अशी टीका करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सुनेत्रा पवार यांची ठाम बाजू मांडली आहे.तृप्ती देसाई म्हणाल्या की, “सुनेत्रा पवार या गुंगी गुडिया असत्या तर त्या आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी पोहोचल्याच नसत्या. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे, राजकीय अनुभवामुळे आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी हे स्थान मिळविले आहे. महिलांविषयी अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरणे योग्य नाही.”यावेळी त्यांनी राजकीय मतभेद असू शकतात, मात्र वैयक्तिक पातळीवर टीका करत महिलांचा अपमान करणारी वक्तव्ये टाळली पाहिजेत, असेही स्पष्ट केले. महिलांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी त्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, विविध स्तरांतून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. तृप्ती देसाई यांच्या या भूमिकेमुळे या वादाला आणखी राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]