अभियानात कार्यकर्त्यांनी वाहनांची काळजी घ्यावी– प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील.
प्रतिनिधी
रायगड (कर्जत) आ.मा.टॉ.टे.न्यू :- गावागावांमध्ये आपल्या कुणबी समाजाचा प्रचार करण्यासाठी जाताना आपली दुचाकी व चार चाकी वाहने कोणाच्याही हातामध्ये चालविण्यास देऊ नये आपले दुचाकी वाहनावर तीन माणसे बसू नयेत ज्यामुळे आपल्याला मनस्ताप काही वेळा अपघाताला सामोरे जाण्याची पाळी येऊ शकते त्यामुळे आपले जीवन दोस्त होऊन आपल्या कुटुंबाला त्रास होऊ 
शकतो पक्षकार्य आनंदाने करा मात्र वाहन चालवताना काळजी घ्या असे मार्गदर्शन आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण प्राध्यापक जयपाल पाटील यांनी अखिल भारतीय कुणबी मराठा समाज संघटना यांच्या कुणबी जोडो अभियान कार्यक्रमात साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय संरक्षक श्री एस पी पटेल महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष संजय जी पाटील जनरल सेक्रेटरी जय जी शेलार कोषाध्यक्ष श्री संदीप काळे, कुणबी समाज कर्जतचे अध्यक्ष श्री शंकर थोरवे, सेक्रेटरी रामदास घरत खजिनदार भगवान घरत प्रवर्तक एडवोकेट गोपाळ गुंजा शेळके महिला विभाग प्रमुख एडवोकेट भारती ढाकवळ, प्राध्यापक एल बी पाटील, श्री दिलीप ताम्हाणे श्री विवेक बडेकर श्री किरण पाटील अध्यक्ष ठाणे श्री सिताराम पाटील उपाध्यक्ष पालघर श्री अनिल मोंडे, श्री सचिन सुभाष पाटील सचिव ठाणे भिवंडी श्री तुकाराम पष्टे विरार व इतर मान्यवर उपस्थित होते.किरवली गावातील श्री साईबाबा चे दर्शन घेऊन कुणबी जोडो अभियानाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत एल. पी. पटेल यांच्या शुभहस्ते होऊन लेझीम छडीपट्टा पथकासह गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवर शेळके बंधू मंगल कार्यालयात पोहोचले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पटेल यांनी सांगितले की कुणबी समाजाच्या नवीन संघटना गावागावा स्थापन करणे कुणबी घटक वर्गाला शक्तिमान करणे कर्तुत्वान गुणवंत व्यक्तींचा महिलांचा सन्मान करणे यासाठी कुणबी जोडो अभियानाचा शुभारंभ रायगड मध्ये छत्रपती शिवरायांच्या जिल्ह्यातून करत आहोत असे सांगितले.कार्यक्रमाच्या शुभारंभाला शाहीर उत्तमराव गायकर नाशिक यांचा पोवाडा होऊन समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांना प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले की गावागावात मोटरसायकल वर जाताना आपण हेल्मेट चा वापर जरूर करावा, वाहनांवर दोनच कार्यकर्त्यांनी बसावे, ज्यांच्याकडे वाहन परवाना आहे त्यांनीच वाहने चालवावीत ज्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागणार नाही वाहतूक नियमांचे पालन करा नाहीतर वाहतूक पोलिसांच्या दंडाला सामोरे जावे लागेल असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय कार्यक्रमाचे नियोजन श्री प्रभाकर शेळके, एडवोकेट सतीश शेळके श्री. शंकर थोरवे यांनी उत्तम प्रकारे केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयेश शेलार यांनी केले तर आभार प्रदर्शन अडवोकेट गोपाल शेळके यांनी मानले या कुणबी जोडो अभियानात भारतातील प्रत्येक राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













