आभाळाकडे लागल्या बळीराजाच्या नजरा; वेळेवर पावसाची प्रतीक्षा
प्रतिनिधी दिलीप करकरे
रायगड ( माणगाव) :- पावसाळ्याची चाहूल लागताच शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा आभाळाकडे लागल्या आहेत. उन्हाच्या झळा सहन करत बळीराजाने शेतजमीन नांगरून पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. मात्र, आता त्याच्या कष्टांना फळ मिळण्यासाठी वेळेवर आणि समाधानकारक पाऊस होणे अत्यंत आवश्यक आहे.आभाळ भरून यावं, धरती हिरवी व्हावी, बळीराजाच्या कष्टांना फक्त पावसाची साथ 
मिळावी,” अशी भावना सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. पावसाच्या आगमनाने शेतांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, कोरडी पडलेली जमीन हिरवाईने नटेल आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलेल.कृषिप्रधान देशात शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबातून अन्नधान्याची निर्मिती होते. त्यामुळे यंदाचा हंगाम भरघोस व्हावा आणि बळीराजाच्या मेहनतीचे चीज व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.निसर्गाने कृपादृष्टी दाखवत वेळेवर पाऊस दिल्यास शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांना नवी पालवी फुटेल आणि ग्रामीण भागात समृद्धीचे दिवस येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













