नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दहिवली गावातील पोलिस पाटील श्री. चंद्रकांत चेरफले साहेब यांना ‘कुणबी रत्न’ पुरस्कार प्रदान – आजचा महाराष्ट्र

दहिवली गावातील पोलिस पाटील श्री. चंद्रकांत चेरफले साहेब यांना ‘कुणबी रत्न’ पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी दिलीप करकरे

रायगड ( माणगाव ) :- दहिवली गावासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरावा असा गौरव नुकताच गावाच्या वाट्याला आला. गावाचे कर्तव्यदक्ष, शांत, संयमी आणि समाजहित जपणारे पोलिस पाटील श्री. चंद्रकांत चेरफले साहेब यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत मानाचा ‘कुणबी रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.कुणबी युवा मंच, मुंबई ता. माणगांव यांच्या वतीने आयोजित भव्य कुणबी रत्न पुरस्कार सोहळा व कुणबी नृत्य कला महोत्सव या कार्यक्रमात हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाला आपले मानून, गावात शांतता, सलोखा आणि आपुलकीचे वातावरण टिकवून ठेवण्यासाठी श्री. चंदकांत चेरफले साहेब यांनी सातत्याने केलेले कार्य आज सर्वांसमोर गौरवाने उभे राहिले आहे.गावातील लोकांच्या अडचणी समजून घेणे, योग्य वेळी धावून जाणे, समाजात एकोपा आणि विश्वास निर्माण करणे, तसेच जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडणे या सर्व गुणांमुळे श्री. चंद्रकांत चेरफले साहेब हे दहिवली गावातील एक विश्वासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.त्यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, संपूर्ण दहिवली गावाच्या कष्टाळू, प्रामाणिक आणि समाजाभिमुख संस्कारांचा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री. चंद्रकांत चेरफले साहेब यांना मिळालेला ‘कुणबी रत्न’ पुरस्कार हा त्यांच्या निःस्वार्थ सेवाभाव, प्रामाणिक कार्य आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा योग्य गौरव आहे.त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रिडा या स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]