नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन! – आजचा महाराष्ट्र

शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन!

प्रतिनिधी

सर्व भाविक व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- डॉ.राजूभाऊ चौधरी

ठाणे (भिवंडी) :- शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ), मराडेपाडा येथे प्रथम वर्धापन दिन सोहळा व शिवजयंती (तिथीनुसार) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा गुरुवार दि. ५ मार्च २०२६ ते शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.गुरुवार दि. ५ मार्च रोजी सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत विधी व होमहवन

पार पडणार असून, सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ह.भ.प. डॉ.श्री.कैलास महाराज निचिते (संस्थापक – वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ, पाषाणे) यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत भजन, सायं. ५.०० ते ६.०० स्वागत व सन्मान सोहळा तसेच सायं. ७.०० ते ८.३० या वेळेत ‘वारी – सोहळा संतांचा’ हा विशेष नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. रात्री ९.३० ते ११.०० या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दि. ६ मार्च रोजी शिवजयंती (तिथीनुसार) निमित्त सकाळी ८.०० ते ९.०० अभिषेक, ९.०० ते ९.३० महाआरती, दुपारी १२.०० ते ४.०० सांस्कृतिक कार्यक्रम, सायं. ४.०० ते ५.०० हळदी-कुंकू, सायं. ६.०० ते ७.०० सत्कार समारंभ तसेच सायं. ७.०० ते ८.३० ‘स्वराज्याचं आख्यान ’ हा ऐतिहासिक संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचा समारोप रात्री ९.३० ते ११.०० या वेळेत स्नेहभोजनाने होणार आहे.या दोन दिवसीय सोहळ्यात विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमांद्वारे शिवचरित्राचे दर्शन घडविण्यात येणार असून, परिसरातील भाविक व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री. राजूभाऊ चौधरी यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समस्त शिवप्रेमींना, शिवभक्तांना केले आहे.

!!जय भवानी! जय शिवराय!!

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]