३९६ वी शिवजयंती अतिउत्साहात साजरी
प्रतिनिधी प्रदिप मोरे
रायगड (रोहा – गावठाण) :- दि. १९ फेब्रुवारी २०२६ :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावठाण येथे ३९६ वी शिवजयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवमुद्रा मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ गावठाण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.शिवजयंतीनिमित्त सकाळी अवचित गड ते गावठाण गाव अशी भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली. मशालींच्या प्रकाशात आणि 
परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीचा समारोप भवानी मंदिर येथे करण्यात आला.यानंतर शिवरायांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करून पूजन व आरती करण्यात आली. आरतीनंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. लहान मुलांनी देशभक्तीवर गीते, पोवाडे व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.सायंकाळी आयोजित व्याख्यानमालेत (शिवश्री) आर्यन बर्डे (वाशी/रोहा) यांनी उपस्थित ग्रामस्थांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श, शौर्य आणि प्रेमभावनेचे प्रेरणादायी विचार मांडले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.त्यानंतर गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाची सांगता महाआरतीने करण्यात आली.महाआरतीनंतर ग्रामस्थांकडून सर्वांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आनंदी व उत्साही वातावरणात ३९६ वी शिवजयंती साजरी करण्यात आली.गावातील सर्व नागरिक, महिला, युवक व बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













