शिवज्योत प्रतिष्ठाण, पहूर यांच्या वतीने शिवजयंती उत्सव २०२६ उत्साहात संपन्न
प्रतिनिधी प्रदिप मोरे
रायगड (कोलाड – पहूर) :- शिवज्योत प्रतिष्ठाण, पहूर (स्थापना २०२०) यांच्या वतीने आयोजित वर्ष ७ वा शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता दुर्गदुर्गेश्वर रायगड पोर्ट कडे प्रस्थान करून उत्सवाची सुरुवात 
करण्यात आली. गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.०० वाजता शिवज्योतीचे आगमन झाले.सकाळी १०.०० वाजता महाराजांचा अभिषेक व विधिवत पूजा पार पडली. दुपारी १२.०० वाजता शिवआरती व शिववंदना भक्तिभावात सादर करण्यात आली. त्यानंतर १२.३० वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ उत्साहात झाला.दुपारी २.०० वाजता गावातून भव्य शिवज्योत मिरवणूक व पालखी सोहळा काढण्यात आला. सायंकाळी ७.०० वाजता माऊली हरिपाठ मंडळ, पहूर यांनी हरिपाठ सादर केला. रात्री ८.०० वाजता उपस्थितांसाठी अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री ९.०० वाजता विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. तसेच सकाळी १०.०० वाजता भैरी देवी प्रसन्न भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.हा उत्सव शिवज्योत प्रतिष्ठाण, पहूर, शिवकन्या ग्रुप, पहूर तसेच ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमास ग्रामस्थ, शिवप्रेमी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













