रोहा-अष्टमी नगर परिषदेत शिवजयंतीनिमित्त छत्रपतींची भव्य मिरवणूक उत्साहात पार
प्रतिनिधी प्रदिप मोरे
रायगड (रोहा) :- दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोहा-अष्टमी नगर परिषद, रोहा यांच्या वतीने शिवजयंती उत्सव २०२६ निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.०० वाजता श्री राम मारुती चौक येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला असून कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे समारोप करण्यात आला.मिरवणुकीत ढोल-
ताशांच्या गजरात, लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली युवक-युवती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आकर्षक देखावे सादर करण्यात आले. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत छत्रपतींना अभिवादन केले.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विधान परिषद, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार मा. श्री. अनिकेत सुनिल तटकरे उपस्थित होते.तसेच नगराध्यक्षा कु. वनश्री अवनी समीर शेडगे, गटनेते श्री. महेंद्र रमेश गुजर, उपनगराध्यक्ष श्री. अहमद हसनमिया दर्जी, मुख्याधिकारी श्री. अजयकुमार सोपानराव एडके यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, उपसभापती,नगरसेवक-नगरसेविका, स्वीकृत नगरसेवक तसेच रोहा-अष्टमी नगर परिषदेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नगर परिषद प्रशासन व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवजयंती उत्सवामुळे शहरात देशभक्तीचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण रोहा शहर दुमदुमून गेले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













