नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोलाड–रोहा–रायगड येथे श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सुरुवात – आजचा महाराष्ट्र 307 Temporary Redirect

307 Temporary Redirect


nginx

कोलाड–रोहा–रायगड येथे श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सुरुवात

प्रतिनिधी प्रदीप मोरे 

रायगड (रोहा) :- दि. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त कोलाड–रोहा–रायगड परिसरात विविध धार्मिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.ही उपक्रममालिका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदू समाज, कोलाड पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून उत्साहात प्रारंभ झाली.मराठा साम्राज्याचे पराक्रमी द्वितीय छत्रपती छत्रपती संभाजी महाराज

यांच्या अद्वितीय शौर्य, धर्मनिष्ठा व बलिदानाची आठवण जागवण्यासाठी हा बलिदान मास दरवर्षी साजरा केला जातो. या महिन्यात व्याख्याने, प्रभात फेऱ्या,धर्मजागृती कार्यक्रम तसेच युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.आज कोलाड येथे भगव्या ध्वजाच्या साक्षीने आणि जयघोषात कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. मोठ्या संख्येने शिवभक्त व हिंदू बांधव उपस्थित होते.आयोजकांनी सर्व हिंदू समाजबांधवांना बलिदान मासातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]