कोलाड येथे सीआयएसएफ ‘वंदे मातरम्’ कोस्टल सायक्लोथॉन–२०२६ चे भव्य स्वागत
प्रतिनिधी महेश स्वामी जंगम
रायगड (कोलाड) :- १३ फेब्रुवारी २०२६ सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी व छावा ग्रुप संघटनेच्या वतीने आज सकाळी ७ वाजता सीआयएसएफ ‘वंदे मातरम्’ कोस्टल सायक्लोथॉन–२०२६ या राष्ट्रीय जनजागृती मोहिमेतील सायकलपटूंचे कोलाड येथे उत्साहपूर्ण व भव्य स्वागत करण्यात आले या स्वागत समारंभात 
श्री. अजय वामन लोटणकर, श्री. विजय शिवाजी शिंदे, श्री. भरतभाऊ सातांबेकर, श्री. राजेश कदम व कुमार कामेश यांसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते. त्यांनी सायक्लोथॉन टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच चहा-पाण्याची व्यवस्था करून जवानांची सेवा केली. राष्ट्रहितासाठी कार्य करणाऱ्या जवानांचे आगत्य व सेवा करण्याची संधी मिळाल्याने धन्यता वाटल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मागील वर्षीही या टीमचे अशाच पद्धतीने स्वागत करण्यात आले होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













