माणगाव येथे एएम अँबॅकस अँड वेदिक मॅथ्स क्लासचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात
प्रतिनिधी दिलीप करकरे
रायगड (माणगाव) :- सौ. पुजा वाघमोडे संचालित एएम अँबॅकस अँड वेदिक मॅथ्स क्लासचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी खरे मंगळ कार्यालय, माणगाव येथे उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास पोलिस निरीक्षक मा. श्री. निवृत्ती बो-हाडे, ज्येष्ठ शैक्षणिक व वैद्यकीय सेवक डॉ. निकम, ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. संजय (अण्णा) साबळे, देश व समाजसेवक मा. श्री. निर्मल सिंग रंधवा, शैक्षणिक व सांस्कृतिक कोकण विभागीय प्रमुख डॉ. अजय मोरे, पत्रकार व समाजसेवक मा. श्री.
शिवभूषण शिसोंदे, सांस्कृतिक कार्यक्रम संचालिका सौ. अश्विनी समेल, शैक्षणिक व सांस्कृतिक संचालिका सौ. अंकिता मोरे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यस्तरीय अँबॅकस परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.अँबॅकस शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, गणितातील रुची व आकलनशक्ती वाढत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.तसेच सौ. पुजा वाघमोडे मॅडम व त्यांचे पती श्री. लाललासाहेब वाघमोडे (पोलीस खात्यात कार्यरत) यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती लक्षणीय असल्याचे पालकांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शैक्षणिक जीवनातील संघर्ष, सातत्य आणि यशाचे महत्त्व यावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साही होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













