विरार पूर्व कारगिल येथे ‘रॉयल फिटनेस’चे थाटात उद्घाटन
प्रतिनिधी
विरार (पूर्व) :- विरार पूर्व कारगिल परिसरात दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘रॉयल फिटनेस’ या आधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन सर्व मित्रपरिवाराच्या सहकार्याने उत्साहात पार पडले.या उद्घाटन सोहळ्यास बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार स.मा. श्री. क्षितिज ठाकूर दादा, नगरसेवक स.मा. श्री. प्रशांत राऊत साहेब, नगरसेविका स.मा. सौ. संगीता भैरे ताई, शिवदुर्गा कॉलनीचे अध्यक्ष स.मा. श्री. विजय शेलार साहेब तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते रिबीन फीत कापून रॉयल फिटनेसचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.यावेळी राजे प्रतिष्ठान रायगडचे खजिनदार श्री. राजेशभाऊ वाघरे हे विशेष उपस्थित होते.रॉयल फिटनेसचे मालक तसेच राजे प्रतिष्ठान रायगडचे अध्यक्ष व संस्थापक स.मा. श्री. सोनल गोलांबडे यांनी आई मंजुला मोहन गोलांबडे, वडील मोहन सोनू गोलांबडे आणि भाऊ नितीन मोहन गोलांबडे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचे व मित्रपरिवाराचे मनःपूर्वक आभार मानले.कार्यक्रमास युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष परेश गोलांबडे, खजिनदार उमेश गोरीवले, नितेश दादा आबेकर, मित्र परिवारातील बंटी भाई, नेहा मॅडम, ज्योती नवले, भावेश उडरे, संजय वाडेकर, अविनाश पाटील, अभिषेक सावंत, संस्कार भाऊ यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नव्या पिढीला आरोग्य व तंदुरुस्तीची दिशा देणाऱ्या या ‘रॉयल फिटनेस’ उपक्रमाबद्दल उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













