नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार – आजचा महाराष्ट्र

क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार

प्रतिनिधी

रायगड-अलिबाग : क्षयरोगमुक्त जिल्ह्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महानगर गॅस लिमिटेडने मुंबई यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून (CSR) ५५० क्षयरुग्णांना ३ हजार ३०० पोषक आहार फूड बास्केटचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते जिल्हा परिषद, अलिबाग येथे करण्यात आले.जिल्हाधिकारी किशन जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्याना निक्षय मित्र बनवून त्यांना फूड बास्केट वाटप देण्यासाठीचे अहवान केले होते त्यास प्रतिसाद देत महानगर गॅस लिमिटेड मुंबईने ही कार्यवाही केली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले की, क्षयरोगमुक्त रायगड जिल्हा घडवण्यासाठी केवळ शासनाचेच नव्हे तर कॉर्पोरेट क्षेत्राचेही योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अधिकाधिक कंपन्यांनी ‘निक्षय मित्र’ बनून क्षयरुग्णांच्या उपचार व पोषणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.पोषणयुक्त आहारामुळे क्षयरोगाच्या रुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक ऊर्जा व प्रतिकारशक्ती मिळते, ज्यामुळे रोगमुक्तीची प्रक्रिया अधिक प्रभावी ठरते. महानगर गॅस लिमिटेडने या उपक्रमातून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवत रुग्णांच्या आरोग्य संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे.या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.प्राची नेहूलकर, महानगर गॅस लिमिटेडचे सहाय्यक उपाध्यक्ष (मानव संसाधन) संकेत धोत्रे, मुख्य व्यवस्थापक (CSR) सुसंता कुमार राउत, सहाय्यक व्यवस्थापक (CSR) कु. प्रियांका दळवी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]