शिक्षकांच्या गरजपूर्तीसाठी शिक्षक पतसंस्थेला मदत करणार – प्रविण दरेकर
प्रतिनिधी ता सचिन पावशे
शिक्षक पतसंस्थेचा शतक महोत्सव उत्साहात
रायगड (अलिबाग) :- प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था विविध योजना राबवून शिक्षकांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवू शकतात. शिक्षकांना दुसर्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. त्यांच्या सर्व गरजा या पतसंस्था पूर्ण करू शकतात. त्यासाठी जी ताकद हवी असेल ती आम्ही देवू, असे आश्वासन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिले.रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा शताब्दी वर्ष महोत्सव सोहळा रविवारी (दि. १४) क्षात्रैक्य समाज सभागृह ,कुरूळ अलिबाग येथे मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख 
पाहुणे म्हणून आमदार प्रविण दरेकर बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे, सर्व संचालक आणि जिल्हाभरातील पतसंस्थेचे सभासद असलेले शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.शिक्षकांना घर विकत घेण्यासाठी प्राथमिक शिक्षक पतसंस्थने योजना राबवावी. त्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेडून मदत दिली जाईल. या पतसंस्थेसाठी कर्जरूपाने ६० कोटी रूपयांची मदत करू, अशी घोषणा आमदार दरेकर यांनी यावेळी केली.रायगड जिल्ह्यात सहकार फारसा वाढला नाही. या जिल्ह्यात सहकार वाढला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षकांची पतसंस्था टिकणे गरजेचे आहे, त्यासाठी राज्य सकारकडून जी मदत लागेल ती मिळवू देण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आमदार महेंद्र दळवी म्हणाले.सकाळच्या सत्रात खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. रायगड जिल्हा प्रथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना शंभर वर्षांपूर्वी करण्यात आली. या पतसंस्थेने खर्या अर्थाने रायगड जिल्ह्याच्या सहकाराला आकार दिला. कायम शिक्षकांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत ही पतसंस्था टिकवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन असे खा. धैर्यशील पाटील म्हणाले.अनेक आव्हानांना सामोरे जात रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकरी पतसंस्था काम करत आहे. या पतसंस्थेने शतक पूर्ण केले आहे. अशा शतकमहोत्सव पूर्ण करणार्या पतसंस्थांचा गौरव महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आ. संजय केळकर यांनी सांगितले.पतसंस्था टिकण्यासाठी केवळ ठेवी मिळवून चालणार नाही तर कर्ज देखील दिली पाहिजेत. शिक्षकांना योग्य वेळेत कर्ज देण्याचे काम या पतसंस्थेने करावे, असे आमदार केळकर म्हणाले. सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे यांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला. पतसंस्थेचे आजी, माजी संचालक, पदाधिकारी, गुणवंत शिक्षक, विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेले शिक्षक, कर्मचारी यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अजित हारवडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













