नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शेतात तुटलेली वीजवाहक तारा ठरणार का मृत्यूला कारणीभूत? – आजचा महाराष्ट्र

शेतात तुटलेली वीजवाहक तारा ठरणार का मृत्यूला कारणीभूत?

प्रतिनिधी शशिकांत माथणे 

उरुलमधील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल; ९ दिवसांपासून विजप्रवाह खंडित, पिकांचे मोठे नुकसान

पाटण (मल्हारपेठ) :- उरुल गावातील पिराची पट्टी शिवारात एका शेतात वीजवाहक तारा तुटून गेल्या ९ दिवसांपासून पडून असून, शेतकरी अक्षय सुभाषराव निकम यांनी वारंवार तक्रार करूनही वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या बेपर्वा व्यवस्थेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, “आता एखाद्याचा जीव गेला कीच दखल घ्यायची का?” असा सवाल स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे.या निष्काळजीपणामुळे निकम यांच्या टोमॅटो आणि झुकेणी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

विजप्रवाह खंडित असल्यामुळे ड्रिपद्वारे खत टाकणे, फवारणी करणे अशक्य झाले. त्यांच्या १ एकर टोमॅटो व १४ गुंठे झुकेणी पिकावर या दिरंगाईचा थेट परिणाम झाला असून त्यांनी वीज वितरण कंपनीकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे सुरक्षेच्या दृष्टीनेही संकट तुटलेल्या वीजवाहक तारा शेतात पडलेल्या असून त्यामुळे शेतात काम करणे धोकादायक ठरत आहे. काही वर्षांपूर्वी पाटण तालुक्यातील मेंढघर येथे अशाच तुटलेल्या तारेमुळे एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तरीदेखील वीज वितरण विभाग तितक्याच बेजबाबदारपणे काम करत असल्याचे चित्र उरुलमध्ये पाहायला मिळते.विजवितरण विभागाच्या दिरंगाईचा चव्हाट्यावर कारभार वीजवाहक तारा लोंबकळणे,झाडांमध्ये अडकणे,पोल वाकलेल्या अवस्थेत ,वारंवार वीजपुरवठा खंडित होणे,तक्रारी करूनही दखल न घेणे अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. घरगुती वीज बिलाची वसुली करताना जशी तत्परता दाखवली जाते, तशीच तत्परता दुरुस्तीकडे का दाखवली जात नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.अधिकाऱ्यांशी संपर्क अपयशी या प्रकरणाबाबत उंब्रज वीज वितरण विभागाच्या जाधव मॅडम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.शेतकऱ्यांचा इशारा: कार्यालयाला घेराव, न्यायालयात जाण्याचा विचार“संबंधित वीजवाहिनीची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास आम्हाला कार्यालयाला घेराव घालावा लागेल आणि झालेल्या नुकसानीविरोधात न्यायालयात जावे लागेल,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

चौकट: शेतकऱ्याचा आक्रोश अक्षय सुभाषराव निकम (शेतकरी, उरुल) :“माझ्या शेतात शेतीपंपाच्या तारा तुटून ९ दिवस झाले. चार–पाच वेळा फोनवरून व एकदा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन सांगितले, तरी दखल घेतली गेली नाही. विजप्रवाह बंद असल्यामुळे टोमॅटो व झुकेणी पिकांचे मोठे नुकसान झाले. मला या नुकसानीची भरपाई हवी.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]