नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्हा परिषदेच्या पेन्शन अदालतमध्ये ५२ अर्ज निकाली – आजचा महाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या पेन्शन अदालतमध्ये ५२ अर्ज निकाली

प्रतिनिधी ता सचिन पावशे

रायगड (अलिबाग) :- दि.२४ रायगड जिल्हा परिषदेच्या मार्फत नुकतेच पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले होते. या पेन्शन अदालतीत ५२ अर्ज निकाली काढण्यात आले‌. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांच्या उपस्थितीत पेन्शन अदालत पार पडली.पेन्शन अदालतमध्ये विविध विभागांचे एकूण १०४ सेवा निवृत्त कर्मचारी यांचे अर्ज प्रलंबित होते. या प्रकरणांचा आढावा सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी

जालिंदर पठारे यांनी घेतला. यामधील ५२ अर्ज निकाली काढण्यात आले. तसेच या लोक अदालतमध्ये ४२ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व प्रलंबित अर्ज पुढील काही दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत.यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, अर्थ, आरोग्य, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभागांमधील प्रतिनिधी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]