नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मांडव्यातील स्थानिकांना लोढा कडून प्रशिक्षण व रोजगार – आजचा महाराष्ट्र

मांडव्यातील स्थानिकांना लोढा कडून प्रशिक्षण व रोजगार

प्रतिनिधी ता सचिन पावशे

रायगड (अलिबाग) :- अलिबागजवळील मांडवा गावात सुरु असलेल्या आलिशान गृहप्रकल्पात स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. लोढा डेव्हलपर्सकडून मांडव्याच्या निवडक तरुणांना इंग्रजी व हॉस्पिटॅलिटीचे प्रशिक्षण देण्यात आले असून, आता हे तरुण थेट सेल्स गॅलरीमध्ये ग्राहकांशी संवाद साधत आहेत. स्थानिक तरुणांच्या क्षमतेकडे अनेकदा दुर्लक्ष होत असताना, लोढाने अलिबागमध्ये इतिहास घडवण्यास सुरुवात केली आहे. मांडवा गावात सुरु असलेल्या एका आलिशान प्रकल्पाच्या निमित्ताने, त्यांनी स्थानिक तरुणांची निवड करून त्यांना आपल्या कार्यसंघात सामावून घेतले आहे. आता हे स्थानिक तरुण थेट मुंबईसारख्या शहरातून येणाऱ्या घर खरेदीदारांशी संवाद साधत आहेत. अलिकडेपर्यंत राकेश रामकांत गवंड अलिबागमध्ये रिक्षा

चालवत होते. ते बारावी उत्तीर्ण असून लोढाच्या टीमने त्यांच्या उत्साही आणि दिलखुलास स्वभावामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांना इंग्रजी आणि हॉस्पिटॅलिटीचे प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर ते लोढा अलिबाग प्रकल्पात भेट देणाऱ्या पाहुण्यांना घेऊन जाणाऱ्या बग्गीचे चालक म्हणून काम करू लागले. त्यांच्या कौशल्यांची दखल घेऊन त्यांच्यावर प्रकल्पाजवळील समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. मला इथे खूप आवडते. बग्गी चालक म्हणून काम सुरु केल्यानंतर ग्राहकांशी संवाद साधण्याचे संपूर्ण प्रशिक्षण मिळाले. आता मी किनाऱ्याच्या स्वच्छतेचाही भाग आहे. वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतात आणि आधीपेक्षा अधिक आत्मविश्वास वाटतो, असे राकेश गवंड यांनी सांगितले. मांडवा गावात पत्नी आणि दोन मुलींंसोबत राहणारे राकेश यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेतले असून, आता आपल्या मुलींना खाजगी इंग्रजी शाळेत पाठवत आहेत. वैष्णवी प्रशांत म्हात्रे यांच्यासाठीसुद्धा आयुष्याने नवे वळण घेतले आहे. बीएससी आयटी च्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या वैष्णवी सध्या ‘लोढा अलिबाग सेल्स गॅलरी’च्या रिसेप्शन डेस्कवर काम पाहतात. त्यांचे वडील रिक्षाचालक होते, पण काही काळापूर्वी कॅन्सरशी झुंज देताना त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर वैष्णवीने घरखर्चासाठी रिसॉर्टमध्ये काम सुरु केले. वडील असताना तिला बीबीए करायचे होते. मात्र त्यांच्यानंतर परिस्थितीमुळे तिने बीएससीचा पर्याय स्वीकारला, कारण त्या कॉलेजमध्ये तिला काही व्याख्यान वगळून काम करण्याची मुभा होती. लोढा टीमने तिच्या कौशल्यांची ओळख घेतली आणि तिला नोकरीची संधी दिली. इंग्रजी संभाषण आणि हॉस्पिटॅलिटीचा थोडकाच कोर्स करून वैष्णवी कामासाठी सज्ज झाली.मला येथे काम करायला आवडते. त्यांनी माझे कौशल्य वाढवले आणि सुधारण्यास मदत केली. एक दिवस मी वरिष्ठ पदावर काम करेन, अशी आशा आहे,असे वैष्णवीने सांगितले.मुंबईसारख्या शहरांतील घर खरेदीदारांशी स्थानिक तरुणांनी थेट संवाद साधावा, हा लोढासाठी सुरुवातीला धाडसी निर्णय वाटला. मात्र कंपनीला स्थानिकांच्या जीवनमान उंचावण्यात खरोखर रस आहे. लोढामध्ये आम्ही केवळ किमान वेतन न देता, चांगले आणि सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी प्रयत्न करतो. आमचे वेतन इतरांपेक्षा अधिक आहे, कारण आमच्या टीमला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटावे, ही आमची भावना आहे. तसेच आमचा कामाचा माहोल हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक वाढीस पूरक राहील असा ठेवला आहे.असे लोढा डेव्हलपर्सच्या प्रवक्त्याने सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]