नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. आर. विद्यालयाच्या संघाचा दणदणीत विजय! – आजचा महाराष्ट्र

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. आर. विद्यालयाच्या संघाचा दणदणीत विजय!

प्रतिनिधी मनिलाल शिंपी

१४ वर्षांखालील गटात अंतिम सामन्यात विजयी तुरा शिरपेचात घेऊन मुंबई विभागीय स्पर्धेत भरारी.

ठाणे – भिवंडी :– महाराष्ट्र राज्य क्रीडा संचलनालय पुणे अंतर्गत जिल्हास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ अंतर्गत आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत पी. आर. विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावले. रविवार, दि.११ ऑक्टोबर २०२६ रोजी रईस हायस्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंनी सांघिक कौशल्य, चपळता, जिद्द आणि खिलाडूवृत्तीच्या

जोरावर विजय मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.या विजयामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून, विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.या विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार श्लोक म्हात्रे याने प्रभावीपणे केले, तर अष्टपैलू खेळाडू पूर्वेश पाटील याने आपल्या उत्कृष्ट खेळाने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. संघातील सर्व खेळाडूंनी एकजूट, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर अंतिम सामन्यात आपली क्षमता सिद्ध केली.या संघाला श्री. प्रकाश भगत व श्री. साबळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या नियमित सरावातून, शिस्तबद्ध तयारीतून आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनातून हे यश साकार झाले.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रंजना पाटील, उपमुख्याध्यापक अरुण जाधव, पर्यवेक्षक वानखेडे मॅडम, पंकज भोईर, क्रीडाप्रमुख निलेश नरवडे आणि साईनाथ म्हस्कर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले व खेळाडूंच्या यशाचे कौतुक केले.विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी शाळा प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असून, या विजयामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार आहे.पी. आर. विद्यालयाच्या कबड्डी संघाने मिळवलेले हे यश म्हणजे खेळाडूंची मेहनत, मार्गदर्शकांचे योगदान आणि विद्यालयाच्या प्रोत्साहनाचा गौरवपूर्ण परिणाम आहे. या विजयाबद्दल संपूर्ण संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]