जिल्हा परिषद येथे असलेल्या जिओ टॅगिंग प्रणाली बाबत ठेकेदार युनियन आक्रमक
प्रतिनिधी ता सचिन पावशे
रायगड (अलिबाग) :– जिल्हा परिषद रायगड येथे ठेकेदार जिओ टॅगिंग प्रणालीबाबत युनियन टॅगिंग आक्रमक झाली आहे.महाराष्ट्र राज्य शासनाकडून काही मोजक्या म्हणजेच तीन जिल्ह्यकरिता जिओ टॅग चा जी. आर.काढून त्या तीन जिल्ह्यांपैकी त्यात रायगड जिल्हा परिषदेचे नाव नमूद केलेले आहे.त्यामुळे आम्हा ठेकेदारांना बिल तयार करताना या प्रणालीचा त्रास होत असल्याकारणाने आम्ही यापूर्वी आपल्या कार्यालयाकडे २४/६/२०२५ रोजी पत्र दाखल केले होते.परंतु आजतागायत आपल्या कार्यालयाकडून अथवा महाराष्ट्र शासनाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही त्याचप्रमाणे 
शासन लावलेल्या प्रणाली रायगड जिल्हा हा दुर्गम भागामध्ये असल्यामुळे इंटरनेटची सुविधा नाही. जिओ टॅगिंग ही प्रणाली पुढील काही महिन्यांकरिता स्थगिती देऊन ठेकेदारांना बिल अदा करावीत असे नमूद करण्यात आले आहे.याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित चैतन्य म्हात्रे,अभिषेक म्हात्रे,रोहन कीर, कौस्तुभ पुनकर, रोहन यादव, महेश शिंदे, रवींद्र ( काका) ठाकूर इत्यादी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













