नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्हावा ग्रामस्थांना विमानतळ प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळायला हवे – आजचा महाराष्ट्र

न्हावा ग्रामस्थांना विमानतळ प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळायला हवे

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मत

रायगड (उरण) :- दि.३  १९८० च्या दशकात पनवेल तालुक्यातील न्हावा येथे माझगाव डॉक आणि ओएनजीसीसारखे प्रकल्प आल्यावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला होता. त्यामुळे एकेकाळी न्हावा गावाने जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार दिला. आज येथील तरुण उच्चशिक्षित झालाय, पण रोजगार नाही. त्यामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरीत सर्वाधिक प्राधान्य न्हावा गावातील तरुणांना मिळायला हवे, असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी न्हावा येथे व्यक्त केले.न्हावा येथील तरुणांनी ‘श्री गावदेवी अवजड वाहतूक वेल्फेअर असोसिएशन’ची स्थापना केली. असोसिएशनच्या नामफलकाचे उद्घाटन महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते झाले. त्यावेळेस ते बोलत होते.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष काशिनाथ ठाकूर, उपाध्यक्ष गणेश ठाकूर, खजिनदार चंद्रकांत पाटील, सचिव चंद्रकांत भोईर, आशीष पाटील, गजानन म्हात्रे, भगवान पाटील, महेंद्र पाटील, मीनाक्षी पाटील, विजया ठाकूर, सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच शैलेश पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]