नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मानव जन्म एकदाच नाही पुनर्जन्म – आजचा महाराष्ट्र

मानव जन्म एकदाच नाही पुनर्जन्म

प्रतिनिधी सतिश वि.पाटील 

मुंबई : भिवंडीत कामवारी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ बुडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय धुमाळ (२५) आणि त्याचा मोठा भाऊ सागर धुमाळ (३०) हे दोघेही नदीत बुडाले. अक्षयचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या सागरचाही बुडून मृत्यू झाला. सविस्तर माहिती:ही घटना भिवंडी तालुक्यातील

गोरसई गावात घडली, जिथे कामवारी नदी आहे.दोघेही भाऊ नदीत पोहण्यासाठी गेले होते.अक्षय पाण्यात बुडत असताना, त्याला वाचवण्यासाठी सागर गेला आणि दोघेही नदीच्या प्रवाहात वाहून गेले.स्थानिक लोकांनी आणि अग्निशमन दलाने शोध मोहीम राबवून त्यांचे मृतदेह बाहेर काढले.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.टिप: कृपया सर्वच महाराष्ट्र राज्य व इतर राज्यात ही भरपूर प्रमाणात पाऊस पडून नदी,धरण,तलाव भरले आहेत तरी क्षणिक मौज मजे साठी धबधबे तसेच पाणी क्षेत्रात निसर्गाचा आनंद लुटण्याचा मोह सर्वच लहान मोठ्यांना होतो तरी प्रथम आपली काळजी घेणे आवश्यक आहे.मौज मजा आज नाही उद्या करु शकता पण गेलेला जीव पुन्हा मिळणार नाही. याची जाणीव ठेवून पावसाळ्याचा आंनद घ्यावा आणि जेथे धोकादायक क्षेत्र आहे तिथे ऑगष्ट महिन्यापर्यंत बंदी आहे आता पर्यंत बरेच अपघात पावसाळ्यात झालेत आणि मृत्यू ही झालेत. अशी ठिकाणे टाळा व आपले बहुमूल्य जीवन वाचवा ! इतरांनाही सुचीत करा .मानव जन्म एकदाच नाही पुनर्जन्म”!

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]