बाल संरक्षणावर एकत्रित पाऊल – जीवन धारा आणि महिला व बाल विकास विभागाची संयुक्त कार्यशाळा
प्रतिनिधी अभिनव येवले
मुंबई : १९ मे २०२५ रोजी मानखुर्द साठे नगर येथे जीवन धारा संस्था आणि शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने “बाल संरक्षण समिती” या महत्त्वपूर्ण विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचा उद्देश विविध यंत्रणा आणि समुदाय सदस्यांमध्ये बालहक्क, संरक्षण प्रक्रिया आणि स्थानिक पातळीवर बाल सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती देणे हा होता. कार्यक्रमात एकूण 
५६ आंगणवाडी सेविका, मानखुर्द पोलीस स्टेशनच्या PSI, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षक सदस्य, जीवन धारा संस्थेचा स्टाफ, तसेच आरोग्य विभागाच्या डॉक्टर उपस्थित होते.कार्यशाळेमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली, ज्यामध्ये बालकांच्या सुरक्षेसाठी कायदेशीर तरतुदी, स्थानिक बाल संरक्षण समितींची भूमिका, तसेच बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी यंत्रणांमध्ये 
समन्वय कसा साधावा, यावर मार्गदर्शन करण्यात आले.ही कार्यशाळा सहभागी प्रतिनिधींना बाल संरक्षणविषयक जबाबदारी समजून घेण्यास आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सजग होण्यास उपयुक्त ठरली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













