नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुणबी युवा मंचाचा अभिनव उपक्रम’ – आजचा महाराष्ट्र

कुणबी युवा मंचाचा अभिनव उपक्रम’

प्रतिनिधी पांडुरंग माने

लोणेरे जि .प.  शाळेत गरजु व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

रायगड (माणगाव) : अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी अनेक जिल्हा परिषद शाळेतील द्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त हाेते. म्हणून लोणेरे येथील जिल्हा परिषद शाळेत विशाल टेंबे यांच्या सहकार्याने कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून गरजुवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासात आली. यावेळी कुणबी युवा मंचाचे सर्वेसर्वा , संतोष मालोरे गुरुजी विशाल टेंबे , शाम टेंबे सतीश भोसले , भारत उंडरे, वैभव टेंबे ऋषी टेंबे हेमंत उतेकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विशाल टेंबे यांनी आम्ही देखील याच शाळेत शिकलो असून मला याचा सार्थ अभिमान आहे या शाळेतील शिक्षणामुळेच आपण यशाचे शिखर गाठु शकतो. आपल्या आई वडील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत यश संपादन करा असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले.या शाळेत विद्यार्थी

बहुतांश वेळा लोणेरे नवघर परिसरातील असतात. गरीब विद्यार्थ्यांकडे काहीसे दुर्लक्ष हाेते. ही बाब लक्षात घेऊन कुणबी युवा मंच यांच्या वतीने पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा ध्यास घेतला आहे.माणगांव तालुक्यात कुणबी युवा मंचाचे नाव सर्वत्र नेहमीच चांगल्या कामाकरता चर्चेत असत तरुणांनी सुरू केलेल्या या संघटनेच्या माध्यमातून आजवर अपघात ग्रस्त व्यक्ती, अनाथ गरजूंना वस्तूंचे तसेच कपड्यांचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,, अंध अपंगांना मदत, अनाथ विद्यार्थ्यांना शालेय खर्च, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यपीठातील स्थानिक कर्मचारी यांना न्याय मिळवून देणे , महावितरण विभाग , शासकीय कार्यालये, तसेच शैक्षणिक, क्रीडा क्षेत्र असो असे अनेक उपक्रम मंचाच्या वतीने राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांनंतर आता शैक्षणिक मदत हा उद्देश डाेळ्यासमाेर ठेऊन अडलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचे आदर्श कार्य युवकांनी हाती घेतले आहे. यात शैक्षणिक साहित्य दिले जात आहे. यावेळी शिक्षणासाठी ललागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले . यावेळी सुर्वे सर, कोतवाल मॅडम, तसेच इतर शाळेतील कर्मचारी वर्ग गावातील नागरिक उपस्थित हाेते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]