स्व.कै. नामदेवशेठ बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ गरीब गरजूना छत्री वाटप.
प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे
रायगड (उरण) : दि.१३ मधुकर शेठ पाटील हे जेएनपीटीचे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. मधुशेठ पाटील यांचे वडिल स्वर्गीय नामदेवशेठ पाटील हे शेतकरी, उद्योजक होते. ते सामाजिक कार्यकर्ते देखील होते. गोर गरिबांना सढळ हाताने ते मोठया प्रमाणात दान करत असत. गोर गरिबांच्या सुख दुःखात ते नेहमी धावून जायचे. वडिलांचा हाच वारसा आज त्यांचे पुत्र मधुशेठ पाटील चालवीत असून विविध सामाजिक कार्य करून, विविध उपक्रम राबवून, गोर गरिबांना मदत करून मधुशेठ 
पाटील यांनी आपल्या वडिलांचा वारसा असाच पुढे चालू ठेवला आहे. कै. नामदेवशेठ बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी जपत बेलपाडा गावातील गोर गरीब गरजूना मधुशेठ पाटील यांनी मोफत छत्र्या वाटप केले आहे. यापूर्वी मधुशेठ पाटील यांनी शाळा कॉलेज मध्ये सतत ३ वर्षे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.वडिलांच्या सलग ७ व्या पुण्य समरण दिनी सुद्धा आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक बांधिलकी जपत मधूशेठ पाटील यांनी गोर गरिबांना मदत करून खऱ्या अर्थाने वडिलांची पुण्यतिथी साजरी केली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













