नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप साठी रायगड भूषण राजू मुंबईकर यांची निवड – आजचा महाराष्ट्र

डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप साठी रायगड भूषण राजू मुंबईकर यांची निवड

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) : दि.१३ २८ वी कॅप्टन S. J. Ezekiel (NR) कॉम्पिटिशन दिनांक ६ जून ते ९ जून २०२५ दरम्यान महाराष्ट्र रायफल संघटना वरळी मुंबई येथे संपन्न झाली, ह्या स्पर्धेत सिद्धांत रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लब रायगड च्या ३१ नेमबाजानी रायगड जिल्ह्या तर्फे सर्वाधिक प्रतिनिधित्व केले होते.त्यामध्ये २५ मिटर स्टॅंडर्ड तसेच MAFC स्पोर्ट्स पिस्टल, ५० मिटर फ्री पिस्टल मध्ये वेदांत किसन खारके नेरे पनवेल, ५० मिटर रायफल प्रोन पुरुष मध्ये गौरव ठाकूर चिरनेर उरण कान्स्य पदक,५० मिटर रायफल प्रोन

जुनिअर मेन मध्ये कुणाल पाटील जासई उरण ह्यास सिल्वर मेडल,राजू मुंबईकर (रायगड भुषण )वेश्वी उरण ५० मिटर रायफल मास्टर मेन,दिग्विजय चौगुले, पार्थ तोडकर ,५० मिटर रायफल जु. वूमन मध्ये वैभवी बिष्ट हिस सिल्वर,कार्तिकी देऊळेकर, व वरा देऊळेकर,५० मिटर प्रोन रायफल मेन मध्ये नंदकुमार माने ठाणे अंमलदार बेलापूर, ५० मिटर रायफल मास्टर मेन मध्ये ५० मिटर फ्री पिस्टल शुभम पुसलकर आणि दुर्गा जाधव, ५० मिटर ओपन साईट रायफल मध्ये करण बेहेरे सिल्वर व मयुरेश सावंत ला कान्स्य, सागर वैगनकर तसेच शॉट गन ट्रॅप मध्ये अवनी कोळी,दिघोडे उरण सिल्वर मेडल, वरा देऊळेकर,व कार्तिकी देऊळेकर डबल ट्रॅप या सर्वांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.ह्या सर्वांची ७ जुलै रोजी देहरादून उतराखंड येथे होणाऱ्या इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप साठी निवड झाली आहे.गौरव ठाकूर व कुणाल पाटील ह्यांस महाराष्ट्र रायफल संघटने च्या सेक्रेटरी शिला कानूगो मॅडम व अध्यक्ष अशोक पंडित सर ह्यांच्या हस्ते पदक देवून सन्मानित करण्यात आले. क्लबचे सेक्रेटरी रायगड भूषण राष्ट्रीय नेमबाज किसन खारके, प्रशिक्षक अलंकार कोळी, राल्स्टन कोयलो,क्लब चे सदस्य अजिंक्य चौधरी,समाधान घोपरकर, अविनाश केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था उरण महाराष्ट्र,रोटरी क्लब सनराईझ पनवेल,श्री साई संस्थान वहाळ, सुभाष सेठ भोपी सामाजिक संस्था रिटघर भारत भोपी भगत,प्रकाश दिसले, सुनील मढवी, समीर अंबवणे, नंदकुमार मुंबईकर तसेच मित्र परिवार ह्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप साठी रायगड भूषण राजू मुंबईकर यांची निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]