छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियानांतर्गत भरणे येथे शिबिर संपन्न
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड-भरणे) :- ११ जून मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी व मा. उपविभागीय अधिकारी खेड यांच्या आदेशानुसार तसेच मा. तहसीलदार खेड यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार, दि. ११ जून २०२५ रोजी महसूल मंडळ भरणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियानांतर्गत एकदिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर काळकाई सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, भरणे येथे पार पडले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुधीर सोनावणे रावसाहेब, तहसीलदार खेड यांनी उपस्थित राहून
लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंडळ अधिकारी श्री. उमाकांत देशमुख यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयोजनामागील हेतू विशद केला, तर कृषी सहाय्यक श्री. आचलखांब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या शिबिरात विविध सेवा लाभार्थ्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यात उत्पन्न प्रमाणपत्र: ३३ अधिवास प्रमाणपत्र: ४ अॅग्रिस्टॅग: २१ मतदार नोंदणी: ७ पीएम किसान योजना अर्ज: ३ सातबारा वितरण: ४२ खाते उतारा वितरण: ७ वारसा फेरफार वितरण: ५ प्रतिज्ञापत्र वितरण: ४१ रेशनकार्ड दुरुस्ती: ३ शिबिरात मंडळातील सर्व महसूल कर्मचारी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, महा ई-सेवा केंद्र आणि सीएससी चालक, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप ग्राम महसूल अधिकारी श्री. विशाल चौगुले यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













