पत्रकार अशोक पाटोळे यांची ‘व्हॉईस ऑफ मिडिया – साप्ताहिक विंग’च्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
पंधरा वर्षांच्या सातत्यपूर्ण पत्रकारितेची दखल आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेकडून सन्मान
ठाणे :- बुधवार दिनांक ११ जून २०२५ भिवंडी तालुक्यातील पत्रकारिता आणि सामाजिक कार्यासाठी सातत्याने सक्रिय असलेल्या भिवंडी वृत्तनामा या साप्ताहिकाचे संपादक अशोक रामराव पाटोळे यांची ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक १० जून २०२५ रोजी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. मंगल वामन डोंगरे यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.देशव्यापी संघटनेतून साप्ताहिक पत्रकारांसाठी हक्काचं व्यासपीठ :‘व्हॉईस ऑफ मिडिया’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत पत्रकार संघटना असून, विविध माध्यमातील पत्रकारांचे हित आणि संघटन यासाठी ही संघटना सातत्याने कार्यरत आहे. विशेषतः साप्ताहिक विंग या उपशाखेमार्फत मराठी आणि हिंदी साप्ताहिकांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार, संपादक आणि सहकाऱ्यांना एकत्र आणणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे, हा प्रमुख उद्देश आहे.अनुभव, कार्यकुशलता आणि संघटनशक्तीची दखल : पत्रकार अशोक पाटोळे यांना संघटनेतून नियुक्ती देताना उल्लेख करण्यात आला आहे की, “आपण पत्रकारिता आणि पत्रकार संघटनांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकता.” त्यांच्या
नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये एकता निर्माण होईल, नवोदित पत्रकारांना दिशा मिळेल आणि साप्ताहिक पत्रकारांचे व्यासपीठ अधिक प्रभावी होईल, अशी संघटनेची अपेक्षा आहे.वरिष्ठ नेतृत्वाचा पाठिंबा : ही नियुक्ती व्हॉईस ऑफ मिडिया चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. संदीपजी काळे, कोकण व मुंबई विभाग अध्यक्ष मा. श्री. अरुणजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. मंगल वामन डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष फारुख मेमन, सरचिटणीस शरद घुडे, भिवंडी महानगर अध्यक्ष मोहन राठोड, भिवंडी तालुका कार्याध्यक्ष महेंद्र सोनवणे, कोषाध्यक्ष प्रवीण सूर्यराव, उपाध्यक्ष बाबुराव करी, सदस्य मन्सूर अन्सारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार पाटोळे यांचे पत्रकारितेतील सातत्य, सामाजिक भान आणि संघटन कौशल्याची ही अधिकृत दखल आहे.जबाबदारी स्विकारताना पत्रकारांचा निर्धार नियुक्ती स्विकारल्यानंतर पत्रकार अशोक पाटोळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ही जबाबदारी म्हणजे माझ्या कार्यकर्तृत्वावर संघटनेचा दाखवलेला विश्वास आहे. पत्रकारांच्या व्यावसायिक सुरक्षिततेसाठी लढा देणे, नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करणे आणि पत्रकार संघटना अधिक बळकट करणे, हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील.”एकत्रीकरण, प्रशिक्षण आणि हक्कांसाठी लढा : साप्ताहिक विंगच्या माध्यमातून लवकरच एक विशेष संपर्क मोहीम राबवून ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील साप्ताहिक पत्रकारांना एकत्र आणण्यात येणार आहे. डिजिटल पत्रकारिता, कायदेशीर मदत, पत्रकार हक्क आणि सुरक्षितता यावर आधारित मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरांची मालिका लवकरच राबविण्यात येईल.पत्रकार पाटोळे यांचा सत्कार आणि शुभेच्छांचा वर्षाव :या नियुक्तीची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य मजूर जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष मा. भारत जी. तांबे व कार्याध्यक्ष मा. महेंद्र सोनवणे यांनी पत्रकार अशोक पाटोळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच, भिवंडी शहरातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, संपादक व पत्रकार मित्रांनी प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीद्वारे शब्दसुमनांनी अभिनंदन केले.पत्रकार अशोक पाटोळे यांची नियुक्ती ही केवळ एक सन्मान नाही, तर ठाणे जिल्ह्यातील साप्ताहिक पत्रकारांच्या संघटनात्मक सशक्ततेसाठी एक नवा अध्याय आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पत्रकार संघटनांचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास जिल्ह्यातील पत्रकारांनी व्यक्त केला आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













