नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महेंद्र पाटील यांची शिवसेना रायगड जिल्हा संघटकपदी नियुक्ती – आजचा महाराष्ट्र

महेंद्र पाटील यांची शिवसेना रायगड जिल्हा संघटकपदी नियुक्ती

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) :- दि .११  शिवसेना (शिंदे गट)पक्षाच्या उरण विधानसभा क्षेत्रात आपल्या ठाम आणि परिणामकारक कार्यशैलीने पक्षवाढीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या महेंद्र मोरेश्वर पाटील यांची शिवसेना पक्षाच्या रायगड जिल्हा संघटकपदी कार्यक्षेत्र उरणमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती म्हणजे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची घेतलेली अधिकृत दखल व कौतुकाचे प्रमाणपत्रच मानले जात आहे.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मार्गदर्शक मानणाऱ्या आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंनी या नियुक्तीस मान्यता दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा स्तरावर प्रभावी नेतृत्व करणारे महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, कॅबिनेट मंत्री श्री. गोगावले, आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी तसेच महाराष्ट्र सचिव संजय मोरे या मान्यवरांनी महेंद्र पाटील यांच्या कार्यक्षमतेची आणि निष्ठेची पोचपावती दिली आहे.महेंद्र पाटील यांनी उरण तालुक्यातील खोपटे पाटीलपाडा येथून कार्याची सुरुवात करून, उरण पूर्व विभागप्रमुख पदानंतर उरण तालुकाप्रमुख पदाने संपूर्ण उरण विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षाच्या विचारांची मुहूर्तमेढ रोवली आहे. स्थानिक जनतेशी दृढ नाळ जुळवत त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक उपक्रम राबवले असून, पक्षाच्या प्रत्येक निर्णयामध्ये ते सक्रियपणे सहभागी राहिले आहेत.पक्षसंघटना मजबूत करणे, नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेणे आणि शिवसेनेचा झेंडा अधिकाधिक गावांमध्ये फडकवण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळणार असा विश्वास कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]