नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उरणमध्ये प्रथमच जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन वन बी तर्फे फॉर्मल प्रेसिडेंट फोरम मीट उत्साहात साजरी. – आजचा महाराष्ट्र

उरणमध्ये प्रथमच जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन वन बी तर्फे फॉर्मल प्रेसिडेंट फोरम मीट उत्साहात साजरी.

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) : – दि ११ उरणमधील भोईर गार्डन कोटनाका येथे जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन वन बी तर्फे फॉर्मल प्रेसिडेंट फोरम मीटचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे हा दैदिप्यमान सोहळा साजरा होण्यासाठीचा बहुमान होम ग्रुपला म्हणजे उरण जायंट्स ग्रुपला मिळाला होता. आणि हा सन्मान जायंट्स ग्रुपच्या इन्चार्ज प्रियंवदा भिकाजी तांबोटकर यांना मिळाला. नियोजित वेळेत सायंकाळी ५ वाजता या मिटिंगची सुरुवात झाली. वेलकम ड्रिंक आणि स्नॅक्स ने पाहुण्यांचे स्वागत झाले. यानंतर उरण जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा संगीता ढेरे यांनी सुंदर शब्दसुमनांनी गुलाबपुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. जायंट्स ग्रुपची प्रार्थना व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमासाठी स्पीकर म्हणून सी,सी.एम.एन्ड इन्चार्ज फॉरमर प्रेसिडेंट फोरम दिनकर अमीन यांना बोलाविण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून वल्ड डेप्युटी चेअरमन पी. सी. जोशी लाभले होते. फेडरेशन वन बी चे अध्यक्ष जायंट विश्वामित्रा भैरवानी यांच्या मार्गदर्शनानुसार हि मिटिंग घेण्यात आली. यासाठी मोलाचे सहकार्य कार्याध्यक्ष एनसीएफ इंजिनिअर सतीश अलगुर यांनी पाहिले.एनसीएफ उपेंद्र मेनन सर, एनसीएफ ललिता वासन, स्पेशल कमिटी मेंबर आनंदराय केणी ,माजी अध्यक्ष ए. एस. महादेवन या दिग्गजांचे मार्गदर्शन

यावेळी लाभले. कार्यक्रमासाठी सचिव म्हणून तृप्ती भोईर यांची नेमणूक करण्यात आली. जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन वन बी तर्फे फॉर्मल प्रेसिडेंट फोरम मीट साठी पवई, मेट्रो, मुलुंड, घाटकोपर, ठाणे, चेंबूर, पनवेल, सी. बी. डी. अशा विविध शहरातून ५० सदस्य, माजी अध्यक्ष उपस्थित होते. माजी अध्यक्ष त्यांचे कार्य, कर्तव्य, ग्रुप साठी असलेले योगदान हे किती महत्त्वाचे असते यावर दिनकर अमीन यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. जायंट्स ग्रुप हे एक कुटुंब असून या कुटुंबात प्रत्येकाला आपले नेतृत्व, कर्तुत्व व दातृत्व याची जाणीव असावी. असे सांगितले. यावेळी पी. सी जोशी यांनी देखील जायंट्स ग्रुपच्या सदस्यांसाठी सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागण्यासाठी प्रोत्साहन दिले. आलेल्या सर्व मान्यवरांनी आपले अभ्यासु मत मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जायंट्स ग्रुप उरण च्या सर्व सदस्यांनी आपले योगदान दिले. कौन्सिल मेंबर रोशनलाल मेहता तसेच अध्यक्षा संगीता ढेरे यांना मागील कार्याचा पुरस्कार माजी अध्यक्ष फेडरेशन वन बी चे ए. एस. माधवन यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या मिटिंग मध्ये फेडरेशन लेव्हलला असलेले फॉर्मल प्रेसिडेंट यांना अध्यक्ष फेडरेशन वन बी जायंट विश्वामित्रा भैरवानी यांनी भेटवस्तू देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. या सभेसाठी माजी अध्यक्ष विनायक पै, सेक्रेटरी चेतन ठक्कर, माजी अध्यक्ष देवेंद्र पिंपळे, सदस्या चैत्राली ठक्कर, सदस्य आनंद ठक्कर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक सदस्यांतील स्नेहाचे, आपलेपणा चे, सहकार्याचे संबंध दृढ होण्यासाठी, आनंदी क्षण वेचण्यासाठी उरण ग्रुप ने विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाच्या आभाराचा भार तृप्ती भोईर यांनी उचलला.सर्वांनी स्नेह भोजन घेतले. यावेळी वातावरण अगदी खेळीमेळीचे , मौजमजेचे असे झाले होते. आणि याच हर्षभरित वातावरणात काही हौसी गायकांनी स्व प्रेरणेने स्फुर्ती ने सुंदर गीते गाऊन या कार्यक्रमाची सुंदररीत्या सांगता केली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]