नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या पुण्यस्मरण दिनी महिला आरोग्य तपासणी शिबिर – आजचा महाराष्ट्र

कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या पुण्यस्मरण दिनी महिला आरोग्य तपासणी शिबिर

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

एक महिला जागृत झाली तर कर्क रोगा सारख्या महा भयंकर रोगाला दूर ठेवता येते – श्रुती म्हात्रे

रायगड (उरण) :- दि .११ एक महिला जागृत झाली तर संपूर्ण कुटुंबाला कर्क रोगापासून दूर ठेवू शकते. आज देशात कर्क ( स्कॅन्सर) रोगाचे प्रमाण वाढत आहे. या रोगाचे रुग्ण आज मृत्यशी झुंज देत आहेत. या रोगाची लक्षणे प्रथम समजून आली तर कर्क रोगाला दूर ठेवू शकते यासाठी माझ्या माध्यमातून काहीसा प्रयत्न आज कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या पुण्यस्मरण दिनी मी केला आहे असे मनोगत काँग्रेसच्या कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले.काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनी आगरी शिक्षण संस्था सेक्टर ६ खांदा कॉलनी पनवेल येथे त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी शाम म्हात्रे यांच्या अनेक कामगार चळवळींना उजाळा दिला. आज शाम म्हात्रे

असते तर सिडको कामगारांचा श्रेय वादात अडकलेला जिव्हाळ्याचा प्रश्न निकाली निघाला असता. पण सिडकोचे कामगार हे माझ्या कुटुंब आहे.त्यांना न्याय देण्यासाठी माझी शेवट पर्यंत लढाई असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा पाटील यांचे नाव देण्यात यावे ही पहिल्या प्रथम मागणी शाम म्हात्रे यांनी केली होती. ती मागणी आज दिल्ली दरबारी पडून आहे. त्यासाठी त्यांनी पक्ष मतभेद बाजूला ठेवून लोकनेते दि. बा पाटील यांचे नाव कसे देण्यात येईल यासाठी जीवाचे रान केले असते.असेही यावेळी श्रुती म्हात्रे म्हणाल्या. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या पुण्यस्मरण दिनी महिला आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर आणि कर्क तपासणी शिबिर आणि कर्क रोगावर व्याख्यान चे आयोजन केले होते. या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने महिला भगिनीने घेतला. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे जेष्ठ नेते आर सी घरत, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, ओ बी सी सेलचे कोकण विभाग अध्यक्ष शंभू म्हात्रे, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे, कांतिभाई गंगर, कल्पेश गंगर, परीक्षित ठाकूर, वैजनाथ ठाकूर आदीसह मोठ्या संख्येने शाम म्हात्रे यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]