जसखार ग्रामपंचायत उपसरपंच पदी हेमलता भालचंद्र ठाकूर यांची निवड
प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे
रायगड (उरण) :- दि १० उरण तालुक्यात प्रसिद्ध व श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत जसखार उपसरपंच जागा रिक्त झाल्यामुळे सोमवार दि.०९/०६/२०२५ रोजी झालेल्या मिटिंग मध्ये शिवसेना भाजप युतीच्या हेमलता ठाकूर या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.या विजयामध्ये उरण विधानसभेचे आमदार महेशशेठ बालदी यांचे तसेच शिवसेना(शिंदे गट)रायगड जिल्हाप्रमुख अतुलशेठ भगत यांचे विशेष सहकार्य लाभले युवा सामाजिक संस्था आणि शिवसेना शाखा जसखार यांच्या माध्यमातून उपस्थित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.या निवडणुकीचे किंगमेकर राकेश तांडेल व सचिन घरत ठरले आहेत.जसखार ग्रामपंचायत उपसरपंच पदी हेमलता 
भालचंद्र ठाकूर यांची निवड झाल्याने दिपक ठाकूर तालुकाप्रमुख उरण, सुरेश म्हात्रे कामगार नेते, निशांत ठाकूर मनसे अध्यक्ष , नितीन पाटील माजी सरपंच , अमित ठाकूर उपतालुकाप्रमुख , ग्रामपंचायत सदस्या सीमा ठाकूर, वैजयंती ठाकूर , धनवंती ठाकूर , दमयंती म्हात्रे ,युवा सामाजिक संस्था अध्यक्ष हर्षल ठाकूर,खजिनदार मयूर तांडेल , रितेश म्हात्रे, भालचंद्र ठाकूर , जनार्दन म्हात्रे ,सतीश वाजेकर,मेघनाथ ठाकूर शाखाप्रमुख ,रवी ठाकूर ,योगेश म्हात्रे,बिट्टू आणि ग्रामस्थांनी उपसरपंच हेमलता ठाकूर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













