नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचे माणगाव येथे शाही स्वागत : स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडला भेट – आजचा महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचे माणगाव येथे शाही स्वागत : स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडला भेट

प्रतिनिधी

रायगड : – दि. ९ महाराष्ट्र शासन व भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत आज पासून प्रवासासाठी निघालेल्या विशेष पर्यटक रेल्वे ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’चे माणगाव रेल्वेस्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. या सर्व पर्यटकांनी आज दुर्गराज रायगडला भेट

देऊन पाहणी केली.या विशेष रेल्वेच्या माणगाव स्थानकावर आगमन प्रसंगी खा. सुनील तटकरे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, माणगाव तहसीलदार दशरथ काळे, भारतीय रेल्वे पर्यटन मंडळ अधिकारी श्रीमती गुप्ता यांसह रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या विशेष रेल्वे मधुन प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे रेल्वे स्थानकावर रायगड जिल्हा प्रशासनाने पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरात औक्षण करून स्वागत केले. तसेच पर्यटकांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पर्यटकांना दुर्गराज रायगडची पर्यटनाच्या दृष्टीने माहिती देणारी घडी पुस्तिका वाटप करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला पहायला, अनुभवायला मिळणार म्हणून पर्यटकामध्ये उत्साही वातावरण होते.छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषाने माणगावरेल्वे स्थानक काही काळ दुमदुमून गेले होते. एकूण १८ बसेस मधून हे सर्व पर्यटक रायगड किल्ल्यासाठी रवाना झाले. दिवसभर रायगड किल्ल्याची पाहणी केल्यानंतर सायंकाळी ही विशेष रेल्वे पुण्याकडे प्रयाण करणार आहॆ.५ दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेणार आहेत.या पाच दिवशीय विशेष रेल्वेचे नियोजन पुढीलप्रमाणे लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.प्रतापगड किल्ला – अफजल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिरपन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]