नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आई मांगीन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमन पदी वैभव कडू यांची निवड – आजचा महाराष्ट्र

आई मांगीन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमन पदी वैभव कडू यांची निवड

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) :- दि. ६ उरण तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यामुळे प्रसिद्ध असलेलं नागांव गाव.प्राकृतिक सौन्दर्य असलेल्या या गावाला खुप मोठी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे.येथील लोकांचा शेती व मच्छीमारी हे प्रमुख व्यवसाय आहे.इतकी मोठी नैसर्गिक देणगी लाभलेल्या या गावाला व इथल्या पारंपरिक मच्छिमारांना गेल्या अनेक वर्षा पासून खुप अडचनींना तोंड द्यावे लागत होते.विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.इथे कोणतीही मच्छीमार

सोसायटी नसल्यामुळे येथील पारंपरिक मच्छीमारांना कोणत्याही शासकीय सोयी सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे येथील मच्छीमार हवालदिल झाला होता.म्हणून नागांव येथील सामाजिक कार्यकर्ते व नागांव /म्हातवली प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू यांनी पुढाकार घेउन स्थानिक मच्छीमारांना एकत्रित घेऊन मच्छीमार सोसायटीची स्थापना केली आहे. आता नागांव/म्हातवली मच्छीमारांना सोन्याचे दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.नव्याने स्थापन झालेल्या सोसायटी च्या चेअरमन पदी निवड झाल्या मुळे वैभव कडू यांच्या वर सर्वच स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वैभव कडू हे लोकनेते भाई.वाय.जे. कडू यांचे चिरंजीव आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )गटाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष भावना ताई घाणेकर याचे धाकटे बंधू आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]