दीपक नायट्रेट कंपनीच्या प्लॉट मधून वाहतोय घातक केमिकलयुक्त सांडपाणी
प्रतिनिधी
अनेकांचे हात झाले काळे? म्हणून होत नाही कारवाई
रायगड (रोहा) : धाटाव औद्योगिक क्षेत्रातील दीपक नायट्रेट कंपनीच्या रिकाम्या प्लॉट मधून मोठ्या प्रमाणात काल्या रंगाचे केमिकल युक्त सांडपाणी सार्वजनिक नाल्याद्वारे नदीत मिसळत असल्याने कुंडलिका नदी प्रदूषित झाली आहे. प्रदूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. भर दिवसा मोठ्या प्रमाणात भिंती मधून सांडपाणी गटाराद्वारे नदीमध्ये सोडले जात आहे. घातक केमिकलचे हे पाणी कोणत्या कंपनीचे आहे?हे शोधण्याचे धाडस प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दाखवत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ह्या 
भिंती मागे दडलंय काय? कोणा कोणाचे हात ह्या पाण्याने काळे झाले आहेत? याचा शोध घेण्याची मागणी पर्यावरण रक्षक सदस्यांनी केली आहे. गेले काही महिने या भल्यामोठ्या भिंतीच्या आतून केमिकलचे पाणी सोडले जात आहे. आपली नैतिक जबाबदारी म्हणून हे पाणी शोधण्याचा प्रयत्न दीपक नायट्रेट कंपनीने न केल्याने ह्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे.रोहा शहराच्या मध्यातून वाहणारी आणि एकेकाळी स्वच्छ जलप्रवाह म्हणून ओळखली जाणारी कुंडलिका नदी केमिकलयुक्त पाण्याने भयावह रूपात दिसून येत असून नदी प्रदूषित झाली आहे. जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.ह्या पाण्याचा शोध घेऊन नदी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













