मा.केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची विवाह सोहळ्यात भेट
प्रतिनिधी
मुंबई :- मुंबई जेष्ठ पत्रकार श्री.सतिश वि.पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात मा.केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी विवेक- भाविका या वधूवरास आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या ! (दिवेअंजुर भिवंडी) इंडियन लाॅजीस्टिक येथे थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला.मा. नगरसेवक तसेच मान्यवर उपस्थित होते.माजीसैनिक यांनी देखील विवाह सोहळ्यात वधूवरास आशिर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.आजच्या धकाधकीच्या काळात ट्राफिक, अवकाळी पाऊस या सर्वांचा समस्यांवर वर मात करून 
विवाह सोहळा मुहूर्तावर पार पडला या मध्ये सर्व नातेवाईक व मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे जेष्ठ पत्रकार श्री.सतिश वि.पाटील व त्याचा जेष्ठ पुत्र विवेक 卐 भाविका यांच्या विवाह ची तारीख २३ मे २०२५ व आई वडील यांच्या विवाह ची तारीख व२३ मे १९९१ असा योग जुळून आला .त्याच्याही लग्न वाढदिवसाच्या नातेवाईकांनी केक कापून शुभेच्छा दिल्या.सर्वाचे मनापासून धन्यवाद .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













