नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उरण रेल्वे स्थानकातील गुडशेडमध्ये घाणीचे साम्राज्य: मोकाट गुरे-ढोरे,बकऱ्या आणि मद्यपी, गर्दुल्ले, प्रेमी युगुलांसाठी अनैतिक धंद्याचा अड्डा – आजचा महाराष्ट्र

उरण रेल्वे स्थानकातील गुडशेडमध्ये घाणीचे साम्राज्य: मोकाट गुरे-ढोरे,बकऱ्या आणि मद्यपी, गर्दुल्ले, प्रेमी युगुलांसाठी अनैतिक धंद्याचा अड्डा

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) :- दि .३१. सध्या उरण रेल्वे स्टेशन हे विविध समस्या मुळे चर्चेत आहे. त्यावर विविध उपाययोजना केल्या जात नसल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.उरण रेल्वे स्थानकातील पश्चिमेकडील गुडशेड मोकाट गुरे-ढोरे,बकऱ्या आणि मद्यपी,अमली पदार्थ सेवन व प्रेमीयुगुलांसाठी एकप्रकारे अनैतिक धंद्याचा अड्डाच बनला आहे.मध्यरेल प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच या ठिकाणी अशी गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.पन्नास वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर सव्वा वर्षांपूर्वी बहुचर्चित उरण-नेरुळ रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.प्रवासी वाहतूकीच्या स्थानकाबाहेर तिकीट घर, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबरच वीजेचे हायमास्टही बसविण्यात आले आहेत.मात्र दुसऱ्या बाजूला असलेल्या मालवाहू स्थानकातुन पाचसहा महिन्यांपासून क्रुड ऑईल, सिमेंट आणि कच्च्या मालाच्या वाहतूकीला सुरूवात झाली आहे. एप्रिलच्या एका महिन्यातच २३१ वॅगनमधुन झालेल्या मालवाहतूकीतुन मध्य रेल्वेने दोन कोटी ८१ लाखांची कमाई केली असल्याचे जनसंपर्क अधिकारी पी.डी. पाटील यांनी सांगितले. मात्र एकीकडे कोट्यवधींची कमाई करणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने मालवाहू फलाटावर अद्यापही कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात अक्षम्य दुर्लक्षच केल्याचे निदर्शनास आले आहे. मालवाहु स्थानकाच्या खुल्या गुडशेडच्या बाजुलाच कोट्यवधींचा खर्च करून मालाची चढउतार करण्याच्या कामांसाठी येणारे माथाडी व इतरांसाठी आराम कक्ष आणि स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे.मात्र कोट्यवधींचा खर्च करून उभारण्यात आलेल्या आराम, कामकाज कक्ष आणि स्वच्छतागृहाची पार दुर्दशा झाली आहे.आराम, कामकाज कक्ष, स्वच्छतागृह आता नावापुरतेच उरले आहेत.यामध्ये दिवसाढवळ्याच मोकाट गुरे-ढोरे, बकऱ्या आणि मद्यपी,अमली पदार्थ सेवन व प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. याकडे रेल्वे प्रशासनाकडूनच होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गुडशेड परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.गुडशेड परिसरात सर्वत्रच अस्वच्छतेमुळे गुडशेड,आराम, कामकाज कक्ष, स्वच्छतागृह आता एकप्रकारे अनैतिक धंद्याचा अड्डाच बनला आहे.रात्रीच्यावेळी तर याठिकाणी हायमास्ट व वीजेची सोय नसल्याने अनैतिक धंद्यांना उतच येत आहे. गुडशेड,आराम, कामकाज कक्ष,स्वच्छतागृहातील पंखे, वायर्स चोरीस गेलेल्या आहेत.यावर कहर म्हणजे चोरट्यांनी कुलूप तोडून आपले कुलुप ठोकले असल्याचे येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी माहिती देताना सांगितले.परिस्थिती अशीच राहिली तर उरण रेल्वे स्थानकातील गुंड शेडमध्ये अनैतिक धंद्यांना उतच येणार असल्याची भीतीही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.या गंभीर परिस्थितीबाबत नेमकी माहिती घेऊन माहिती देतो अशी प्रतिक्रिया जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी दिली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]