नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार – आजचा महाराष्ट्र

ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (गृहागर) :- गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वाचनालयाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र सिताराम आरेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर हायस्कूल येथे संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थ्यांना वाचनालय तर्फे भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.श्री. राजेंद्र आरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. श्री कांबळे सर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल वाचनालया तर्फे सन्मान करण्यात आला.यावेळी हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ कांबळे मॅडम, गंगावणे सर, सौ.मनाली बावधनकर, श्री दत्तात्रय गुरव, श्री प्रभुनाथ देवळेकर, श्री ज्ञानेश्वर झगडे, सौ गौरी घाडे, कु. सानिका जांगळी व पालक वर्ग उपस्थित होते. सौ मनाली बावधनकर यांनी सूत्रसंचालन केले व श्री ज्ञानेश्वर झगडे यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]