नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आंबेवाडी आरोग्य केंद्रात सकल हिंदू समाजा तर्फे भव्य रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न – आजचा महाराष्ट्र

आंबेवाडी आरोग्य केंद्रात सकल हिंदू समाजा तर्फे भव्य रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न

प्रतिनिधी

रायगड (कोलाड) :- ३१ मे २०२५ सकल हिंदू समाज – कोलाड पंचकोशी यांच्या वतीने आंबेवाडी आरोग्य केंद्र, कोलाड येथे आयोजित केलेले भव्य रक्तदान शिबीर अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीने पार पडले.”रक्तदान करूया – एक पुण्यकर्म करूया” या उदात्त हेतूने आणि समाजातील रक्ताची गरज लक्षात

घेऊन हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शनिवार, दिनांक ३१ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत झालेल्या या शिबिरात कोलाड पंचकोशी परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या शिबिरात एकूण ५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. युवक-युवतींसह विविध वयोगटातील नागरिकांनी समाजाप्रती

आपली जबाबदारी पार पाडत आपले योगदान दिले.शिबिराचे यशस्वी आयोजन करणाऱ्या सकल हिंदू समाजाचे तसेच आंबेवाडी आरोग्य केंद्र व इतर सहकार्य करणाऱ्या संस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.रक्तदानाच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून भविष्यात असे उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]