नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे प्लास्टिक मुक्त गाव अभियान वडवली गावात संपन्न – आजचा महाराष्ट्र

रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे प्लास्टिक मुक्त गाव अभियान वडवली गावात संपन्न

प्रतिनिधी

रायगड :- रायगड मी मराठी प्रतिष्ठान रजि. जी. बी. बी. एस. डी. /१४२५/२०२१/एफ ७९४११ रायगड मी मराठी प्रतिष्ठानने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्लास्टिकमुक्तीचा संकल्प केला होता. या संकल्पानुसार प्लास्टिकमुक्ती अभियानाचे आयोजन मंडणगड तालुक्यातील वडवली गावात करण्यात आले.या उपक्रमांतर्गत गावात जनजागृती मोहीम राबविण्यात आली, ज्यामध्ये गावकऱ्यांना प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच पर्यायी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर कसा करावा,

याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तसेच गावातील ग्रामस्थांनी गावातील रस्ते, मोकळी जागा आणि परिसर स्वच्छ करत प्लास्टिक कचरा गोळा केला. तसेच १५० ± कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर प्लास्टिकचे मानवी आणि निसर्गावर गंभीर परिणाम तसेच आपण कोणती काळजी घ्यावी; कोणत्या वस्तू जास्त वापराव्यात व आणखी जनजागृती कशी करावी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]