नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अखेर आझाद मैदानातील उपोषण लढ्याला यश पत्रकार मोरे – आजचा महाराष्ट्र

अखेर आझाद मैदानातील उपोषण लढ्याला यश पत्रकार मोरे

प्रतिनीधी श्री.सतिश वि.पाटील

सर्व अटी प्रशासनाकडून मान्य…

मुंबई : दि. २२ एप्रिल २०२५ रविराज मोरे उपोषण, कर्त्या सह पत्रकारांचे जंगी स्वागत अकोट तालुका पत्रकारिता क्षेत्रातील धडाडीचे नेतृत्व गाजवणारे रविराज मोरे हे १४ एप्रिल पासून आमरण उपोषणाकरिता आझाद मैदान येथे बसले होते माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी व जाचक अटी शिथिल करून पत्रकारांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळावा तसेच अकोट सारख्या संवेदनशील शहरात सर्व अधिकारी नवखे असल्यामुळे संपूर्ण जनता त्रस्त झालेली आहे त्याकरिता अनुभवी अधिकाऱ्यांची मागणी सुद्धा रविराज मोरे यांनी उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकार यांच्याकडे केली आहे मोरे यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून सर्व मागण्या करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले व तात्काळ अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे अकोल्यातील बोगस शिक्षकाच्या मागणी संदर्भात तात्काळ चौकशी करिता शिक्षण उपसंचालक यांची नियुक्ती करून अकोल्याच्या शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्यावर सुद्धा कठोर कारवाईची टांगती तलवार

रविराज मोरे यांच्या उपोषणामुळे उभी झाली आहे रविराज मोरे यांच्या उपोषणाला अनेक पत्रकार संघटना व जवळपास सर्वच राजकीय पक्षाकडून पाठिंबा मिळाला आहे तसेच त्यांची सहकारी बांधव पवन बेलसरे, अकबर खान, दिपक दाभाडे, रामदासजी बोंडे, पुर्णाजी खोडके, अभिजीत सोळंके, परमेश्वर पाटील, कैलास अकर्ते, गोपाल केदार, मनीष राव, विठ्ठल लोणकर, राहुल आग्रे यांनी सुद्धा मोरे यांच्या खांद्याला खांदा लावून उपोषणामध्ये भाग घेतला यांच्या सर्व सहभागाने ऐतिहासिक उपोषण यशस्वी झाल्यानंतर आज रविराज मोरे सह वरील सर्व टीम चे मुंबईवरून अकोट येथील रेल्वे स्टेशनवर थेट आगमन झाले यादरम्यान ज्येष्ठ पत्रकार अरुण काकड, विठ्ठल कुलट, अविनाश डिक्कर, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे परवेज खान,सुभाष तेलगोटे सह शेकडो कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन बाहेर रविराज मोरे यांच्या टीमचे फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत केले त्यामध्ये मोरे सह इतर सर्व उपोषणकर्त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार धनु बायवार, श्याम महाजन, विशाल आग्रे, शपाकत देशमुख,गणेश वाकोडे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सोबतच रविराज मोरे यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या समाजातील सर्व सन्माननीय घटकांकडून मिळालेला आशीर्वाद व सहकार्यामुळे उपोषण यशस्वी झाल्याच्या भावना व्यक्त केल्या असून सर्व पत्रकार बांधव ,मार्गदर्शक, तसेच सन्माननीय मंडळींचे नम्रःपूर्वक आभार मानले व असाच लढा दिल्लीच्या रामलीला मैदानापर्यंत पोहोचवणार असल्याची ग्वाही सुद्धा दिली.मी ऐतिहासिक उपोषण यशस्वी केले परंतु याकरिता मला अनेक ज्येष्ठ सन्माननीय मंडळींनी मार्गदर्शन केले यामागे अनेकांचे आशीर्वाद असून माझ्या जिवलग मित्रांची साथ मला लाभली मुंबईवरून अकोट ला पोहोचताच रेल्वे स्टेशन वरच माझ्यासह माझ्या टीमचा सन्मान केला त्यामुळे मी सर्व लहानापासून मोठ्यापर्यंत आकोटकरांचे आभार मानतो व हा लढा असाच दिल्लीच्या रामलीला मैदानापर्यंत जाईल अशी ग्वाही देतो रविराज मोरे सारखा लढवय्या पत्रकार मी आजपर्यंत बघितला नाही लिखाणातून लढा देत असताना मैदानात उतरून सुद्धा प्रशासनाशी समोरासमोर बेधडक मुद्दे मांडणारा पहिला पत्रकार आहे याकरिता आम्ही सर्व आकोटकर त्यांच्यासोबत आहोत आणि यापुढेही त्यांच्या प्रत्येक संघर्षामध्ये आमचा सहभाग राहणार

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]