नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रौप्य महोत्सवी पालखी सोहळा पदयात्रा : मुलुंड ते कार्ला – आजचा महाराष्ट्र

रौप्य महोत्सवी पालखी सोहळा पदयात्रा : मुलुंड ते कार्ला

प्रतिनिधी सतिश पाटील

मुंबई (मुलुंड) : आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड ” या मंडळातर्फे रविवार दि.३० मार्च २०२५ रोजी ही पालखी मुलुंड (पूर्व) येथील गावांमध्ये फिरते व सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ ते शनिवार दि.५ एप्रिल २०२५ या कालावधीत मुलुंड ते श्रीक्षेत्र कार्ला लोणावळा असे पदयात्रा पालखी सोहळ्याचे यंदाचे २५ वे वर्ष आहे.सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ ला सायंकाळी ४ वाजता श्री तुंगवतेश्वर मंदिर – राजे संभाजी मैदान,मुलुंड (पुर्व) मुंबई येथून सदर पालखी सोहळ्याचा

शुभारंभ होणार आहे.या सोहळ्यानिमित्त महाप्रसाद (भंडारा) मंगळवार दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी मुलुंड येथील तरुण उत्कर्ष मंडळाच्या मैदानात सांय : ७ ते १० या वेळेत होणार आहे.या सोहळ्याच्या माध्यमातून कार्ला येथे समाजातील लोकांसाठी भक्त

निवास उभारण्यासारखा चांगला उपक्रमही या मंडळातर्फे राबविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.यंदाचे वर्ष रौप्य महोत्सवी असल्यामुळे भाविकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे दिसून येत आहे असे “आई एकविरादेवी भक्त मंडळाचे धडाडीचे अध्यक्ष श्री.कैलास रघुनाथ पाटील साहेब यांनी दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]