नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जनता दरबार मुलुंड पोलिस ठाणे झोन ७ येथे सपन्न – आजचा महाराष्ट्र

जनता दरबार मुलुंड पोलिस ठाणे झोन ७ येथे सपन्न

प्रतिनिधी सतिश पाटील

मुंबई (मुलुंड) :- दि: २९मार्च २०२५ रोजी मुलुंड पोलिस ठाण्याच्या आवारात सकाळी ११:00वाजता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पोलीस ठाण्यात दाखल व प्राप्त झालेल्या एफ.आय.आर ,एन.सी तसेच तक्रार अर्जातील एकूण ७० महीला /पुरूष तक्रारदार यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते.त्यापैकी एकूण १८ महीला व १४ पुरूष असे एकूण ३२तक्रारदार मुलुंड पोलिस ठाणेस हजर होते .यात ११जेष्ठ नागरिक हजर

होते.सदर कार्यक्रमात पोलिस निरीक्षक मा.कोकाटे सर (जनसंपर्क),पोलिस निरीक्षक मा.चव्हाण सर( सायबर) व इतर पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.उपस्थित तक्रारदार यांच्या समस्यांबाबत बाबत दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून चर्चासत्र घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यात आले .यात घरगुती, व्यवसायिक, मालक – भाडेकरू यांचा समावेश होता.हरवलेल्या वस्तू मध्ये पाच मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले.मुलुंड मधील नागरिकांचा देखील या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे .पोलिस व जनता यातील दरी या कार्यक्रमातून दूर करण्याचे काम मुलुंड पोलिस ठाणे अनेक वर्ष अविरत करीत आहेत. मुलुंड पोलिस ठाणे वरिष्ठ यांच्या संकल्पनेतुन कार्यक्रम राबविण्यात येतो.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]